• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Sangli | ऊस दरासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको

Admin by Admin
November 20, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
Sangli: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अडवली ऊस वाहतूक, ठिकठिकाणी आंदोलन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

उसाला टनाला तीन हजार पाचशे रुपये द्या, गेल्या हंगामातील ४०० रुपये द्या, अशी मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रविवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

परिणामी, अनेक ठिकाणी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. काही ठिकाणी ऊस तोडी बंद पाडल्या. वाहनांचीही तोडफोड करण्यात आली.

सांगली-इस्लामपूर मार्गावर लक्ष्मी फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला होता. परिणामी, वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याठिकाणी वाहनधारक, पोलिस आणि कार्यकर्र्ते यांच्यामध्ये किरकोळ वादावादी झाली. पलूस तालुक्यात विजापूर- गुहागर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारला.

कवठेमहांकाळ तालुक्यामधील जत-सांगली रोडवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस वाहतूक करणारे टॅ्रक्टर अडवून रास्ता रोको करण्यात आला होता. तासगाव तालुक्यातील विटा-तासगाव रोडवर बोरगाव फाटा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

इस्लामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन केले. यामुळे सुमारे सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मागण्या मान्य नाही झाल्या तर संघटनेने आणखी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आंदोलन आणखी चिघळणार आहे. ताकारी (ता.वाळवा) येथे रास्ता रोको करीत चक्काजाम आंदोलन केले. यामुळे सुमारे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनाचे नेतृत्व पोपट मोरे, महेश खराडे, संदीप राजोबा, संजय बेले, भागवत जाधव, संजय खोलखुंबे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले.

Previous Post

Dysp च्या कामगिरीची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा

Next Post

Breaking : “या” माजी मंत्र्याच्या स्विय सहायकाविरोधात गुन्हा दाखल, राजकीय घडामोडींना वेग

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.

Breaking : "या" माजी मंत्र्याच्या स्विय सहायकाविरोधात गुन्हा दाखल, राजकीय घडामोडींना वेग

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group