• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मारहाण करुन नागरीकांना लूटणारे दोन चोरटे सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांच्या अटकेत

Admin by Admin
November 13, 2023
in क्राईम
1 min read
0
मारहाण करुन नागरीकांना लूटणारे दोन चोरटे सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांच्या अटकेत
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

५ नाेव्हेंबरच्या दिवशी कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नागरीकाला मारहाण करुन त्याच्याकडून महागडी चैन आणि त्याची पर्स ज्यामध्ये दहा हजार रुपये होते.

कल्याण : एका नागरीकाला मारहाण करुन त्याची चैन आणि पैसे लुटणाऱ्या दोन चोरट्यांना कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.

निहाल शेख आणि चांद शेख अशी या चाेरट्यांची नावे आहे. या दोघांकडून बाईक चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. यांच्याकडून चोरी केलेली चैन, रोकड आणि तीन बाईक हस्तगत करण्यात आली आहे. हे दोघेही नशेखोर असून नशेकरीता ते चोरी करीत होते.

५ नाेव्हेंबरच्या दिवशी कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नागरीकाला मारहाण करुन त्याच्याकडून महागडी चैन आणि त्याची पर्स ज्यामध्ये दहा हजार रुपये होते. दोन बाईक स्वार तरुण घेऊन पसार झाले. ही घटना सीसीटीव्हीत कैद होती. सीसीटीव्हीत दिसणारे चोरटे आणि गाडी नंबरच्या साहाय्याने कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी शोध सुरु केला. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अजिंक्य मोरे तपास करीत होते. अखेर या प्रकरणात दोघांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. निहाल शेख आणि चांद शेख अशी या चोरट्यांची नावे आहे.

दोघांकडून पोलिसांनी चोरीस गेलेले दागीने आणि रोकड हस्तगत केली आहे. या दोेघांनी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाईक चोरी केली होती. त्या बाईक देखील पोलिसांनी हस्तगत केली आहे. निहाल हा रिक्षा चालक आहे. तर चांद हा रिकामटेकडा आहे. दोघांना नशेखोरी करण्याची सवय आहे. नशा करण्यासाठी पैसे नसल्याने या दोघांनी चौरीचा मार्ग पत्करला होता.

Previous Post

धक्कादायक ! | हवालदाराच्या अवघ्या 5 वर्षांच्या मुलीवर PSI ने केला बलात्कार; पीडितेच्या आईने आरोपीला चांगलंच चोपलं..

Next Post

Maharashtra Politics | शिंदे-भाजप सरकारमध्ये अजित पवार गट अस्वस्थ; निधी मिळत नसल्याचा आरोप

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Maharashtra Politics | शिंदे-भाजप सरकारमध्ये अजित पवार गट अस्वस्थ; निधी मिळत नसल्याचा आरोप

Maharashtra Politics | शिंदे-भाजप सरकारमध्ये अजित पवार गट अस्वस्थ; निधी मिळत नसल्याचा आरोप

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group