• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Sangli: तासगावात भरवस्तीत फटाक्यांचा स्फोट; प्रशासनाच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली..

Admin by Admin
November 7, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
Sangli: तासगावात भरवस्तीत फटाक्यांचा स्फोट; प्रशासनाच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

तासगाव : तासगाव शहरात सोमवार पेठेत सोमवारचा आठवडा बाजार भरलेला असतानाच, नागरिकांचा गजबजाट असलेल्या सोमवार पेठेतच फटाक्यांचा साठा करून ठेवलेल्या दुमजली इमारतीस भीषण आग लागली. आगीत ही इमारत जळून खाक झाली.

फटाक्यांचा स्फोट आणि आगीच्या ज्वाळांनी तासगावकर धास्तावले होते. प्रशासनाच्या तत्परतेमुळे जीवितहानी टाळली असून रात्री उशिरापर्यंत सहा अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या माध्यमातून आग आटाेक्यात आणण्याचे काम सुरू होते. घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

तासगावातील सोमवार पेठेत कोकणे नामक व्यक्तीचे फटाके विक्रीचे दुकान आहे. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या दुमजली घरातच फटाक्यांचा साठा ठेवण्यात आला होता. सोमवारी आठवडा बाजाराचा दिवस होता. फटाक्यांचा साठा करून ठेवलेल्या परिसरातच आठवडा बाजारदेखील भरतो.

नागरी वस्तीने गजबजलेल्या या परिसरातच सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास फटाक्यांच्या साठ्याला आग लागली. त्यानंतर फटाक्यांचे स्फाेट सुरू झाले. आगीत कोकणे यांची दुमजली इमारत भस्मसात झाली. फटाक्यांचे स्फाेट आणि आगीच्या उंचच उंच ज्वाळांचे लोट यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. आगीची माहिती मिळताच तासगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.

तहसीलदार रवींद्र रांजणे, पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सांगली महापालिका विटा नगरपरिषद तसेच चितळे दूध डेअरी अशा सहा अग्निशमन पथकांना पाचारण करण्यात आले. सहा गाड्यांच्या माध्यमातून आग आटाेक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू हाेते.

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय अडचणीत असलेल्या ठिकाणातून मार्ग काढत जीव धोक्यात घालून आग आटाेक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालविले हाेते. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग तत्काळ आटोक्यात आली. भर वस्तीत फटाक्यांचा स्फोट झाल्यामुळे तासगावकरांचा जीव टांगणीला लागला होता. नागरिकांत घबराटीचे वातावरण दिसून येत होते.

आग लागलेला परिसर रिकामा

फटाक्यांनी आग लागलेला परिसर पोलिस आणि पालिका प्रशासनाकडून तत्काळ रिकामा करण्यात आला. आग लागलेल्या इमारतीसह अन्य सर्व इमारतीतील नागरिकांना तातडीने घटनास्थळापासून दूर हलविण्यात आले. त्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. फटाक्यांचा स्फोट झाल्याची बातमी तासगाव शहरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे घटनास्थळी माेठी गर्दी झाली हाेती.

Previous Post

Sangli Gram Panchayat Election Result : सांगलीत दोन गटात जोरदार वादावादी

Next Post

सांगली ब्रेकिंग | ६४ लाखांचा गंडा घालत गॅस वितरण कंपनीला लुटले..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
टेलिग्राम ग्रुपमधून ऑनलाईन फसवणूक ; २१ लाखांचा शोध घेताना तब्बल २७ खात्यांमध्ये सापडली आठ कोटींवर रक्कम

सांगली ब्रेकिंग | ६४ लाखांचा गंडा घालत गॅस वितरण कंपनीला लुटले..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group