• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग! एसटी वाहतूक मंगळवारी राहणार बंद? पुणे, मराठवाडा, कर्नाटकला जाणारी एसटी वाहतूक रात्रीपासून बंद.

Admin by Admin
October 30, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय, सामाजिक
1 min read
0
मोठी ब्रेकिंग! एसटी वाहतूक मंगळवारी राहणार बंद? पुणे, मराठवाडा, कर्नाटकला जाणारी एसटी वाहतूक रात्रीपासून बंद.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : मराठा आंदोलक आरक्षणाच्या मागणीवरून आता आक्रमक झाले आहेत. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरसह बहुतेक जिल्ह्यांमध्ये जाळपोळीच्या घटना घडत आहेत. काही एसटी गाड्यांची तोडफोड तर जाळपोळ होत आहे.

या पार्श्वभूमीवर उद्या (मंगळवारी) दिवसभर एसटी गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत असणार आहे. पोलिसांशी चर्चा करूनच त्यांच्या सूचनांनुसार वेगवेगळ्या मार्गांवरून गाड्या सोडण्याच्या सूचना सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आल्या आहेत.

सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी करीत तरूण आता रस्त्यावर उतरून रास्तारोको करीत आहेत. शेकडो गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आली असून आता मंत्री, आमदार, खासदारांच्या घरांवर मोर्चे काढले जात आहेत. काही आमदारांची घरे, पक्षांची कार्यालये पेटवली जात आहेत.

या पार्श्वभूमीवर आता एसटी वाहतूक बंद ठेवली जात आहे. सोमवारी (ता. ३०) मध्यरात्रीपासून अनेक जिल्ह्यातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पुणे- पंढरपूर मार्गावरील वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे. उद्या (मंगळवारी) आंदोलक आणखी आक्रमक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे एसटी बसची वाहतूक आता तुर्तास बंद ठेवली जावू शकते. तशा सूचना पोलिस प्रमुखांनी संबंधित विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत. पोलिसांशी चर्चा केल्याशिवाय आणि पोलिसांनी ग्रीन सिग्नल दिल्याशिवाय बस सोडली जाणार नाही, अशी भूमिका विभाग नियंत्रकांनी घेतली आहे.

पोलिसांच्या सूचनांनुसारच एसटी वाहतूक

पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिलेल्या सूचनांनुसार काही मार्गांवरील एसटी वाहतूक सध्या बंद ठेवली आहे. कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक पूर्णपणे थांबविली असून तिकडून येणाऱ्या गाड्याही थांबविण्यात आल्या आहेत.

– विनोद भालेराव, विभाग नियंत्रक, सोलापूर

कर्नाटकला जाणारी व येणारी वाहतूक बंद

कर्नाटकात गाड्या पाठवू नयेत, अशा सूचना तेथील अधिकाऱ्यांनी सोलापूर विभागाला केल्या आहेत. तसेच राज्यातील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या एसटी गाड्या देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. आता महाराष्ट्रातील पोलिसांच्या सूचनांनंतरच कर्नाटकातून गाड्या येतील, अशी सद्य:स्थिती आहे.

Previous Post

मराठा आरक्षणासाठी विधिमंडळ अधिवेशन बोलवा

Next Post

विटा येथे मराठा कार्यकर्त्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे तणाव..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
विटा येथे मराठा कार्यकर्त्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे तणाव..!

विटा येथे मराठा कार्यकर्त्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे तणाव..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group