• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग सांगली | दसरा मेळाव्याला निघालेल्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा अपघात, तिघेजण जखमी : अपघातात एकाचा मृत्यू

Admin by Admin
October 24, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी / आज मुंबईत दसरा मेळावा होणार आहे. यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत येत आहेत. दरम्यान, सांगलीतून एक मोठी मोठी बातमी समोर आली आहे. मेळाव्यासाठी येत असलेल्या शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू तर तिघेजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेली माहिती अशी, रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातून जात असताना हा अपघात झाला. एका ट्रकने पाठिमागून कारला धडक दिली. यामुळे हा अपघात झाला. या कारमध्ये युवा सेनेचे पदाधिकारी होते, अशी माहिती समोर आली आहे.

आज मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाही दसरा मेळावा होणार आहे. यासाठी दोन्ही गटाकडून मोठी तयारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने आझाद मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे.तर ठाकरे गटाच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थ मैदानावर होणार आहे.

दसरा सण आणि मुंबईमध्ये होणारे शिवसेनेचे दोन दसरा मेळावे यात मुंबईची कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज झाले आहेत. आज मुंबईत दसरा मेळाव्यासाठी तब्बल ६ अतिरिक्त आयुक्त, १६ डीसीपी, ४६ एसीपी, २४९३ पोलीस निरीक्षक, १२४४९ पोलीस शिपाईंसह ३३ एसआरपीएफ क्यूआरटी आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | राजकारणात मन रमत नाही, माजी खासदार नीलेश राणे यांची राजकीय निवृत्तीची घोषणा !

Next Post

मोठी ब्रेकिंग | गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची प्रचंड तोडफोड; मराठा तरुणांचा सर्वात मोठा दणका..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची प्रचंड तोडफोड; मराठा तरुणांचा सर्वात मोठा दणका..!

मोठी ब्रेकिंग | गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची प्रचंड तोडफोड; मराठा तरुणांचा सर्वात मोठा दणका..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group