• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | तरसाच्या धडकेत वाळेखिंडी येथील युवक जखमी

Admin by Admin
September 22, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
0
ब्रेकिंग | तरसाच्या धडकेत वाळेखिंडी येथील युवक जखमी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वाळेखिंडी (ता.जत) येथे तरसाच्या हल्ल्यात शेतकरी युवक जखमी झाल्याची घटना घडली आहे. संजय रामचंद्र टोणे (वय ३०) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाळेखिंडी गावातील शेतकरी संजय टोणे हे गावापासून चार किलोमीटर अंतरावरील टोनेवस्ती येथे राहतात. ते दुचाकीवरून गावाकडे कामानिमित्ताने गेले होते. काम आटोपून पुन्हा घरी जाताना पाटील वस्ती येथून पुढे काही अंतरावर एका तरसाने संजय टोणे यांना पायाजवळ धडक दिली. यामुळे संजय हे बाजूला जाऊन पडले. या धडकेत पायाच्या गंभीर दुखापत झाली आहे. या मार्गावर रहदारी अत्यंत कमी आहे. तसेच हा भाग डोंगराळ आहे.

यासह या क्षेत्रात ऊसशेती मोठेप्रमाणात असल्याने मदतीसाठी अडचण आली. त्यातूनही स्वताला सावरत संजय यांनी आशिष शिंदे, राजेंद्र टोणे, प्रवीण बाबर यांना फोनवरून घटना सांगितली. त्यानंतर या तिघांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने उपचारासाठी संजय यांना सांगली येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Previous Post

सांगली : पलुसमध्ये नाभिक समाजाचे मुंडण करून आंदोलन..

Next Post

मोठी बातमी | शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? ‘या’ आमदाराने वर्तविले भविष्य

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.

मोठी बातमी | शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? ‘या’ आमदाराने वर्तविले भविष्य

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group