• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कृष्णा व्हॅली चेंबरने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश – सतीश मालू.

Admin by Admin
September 1, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
कृष्णा व्हॅली चेंबरने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश – सतीश मालू.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या मंजुरीमुळे कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील संपूर्ण रस्ते हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक यांनी दिली.

(कुपवाड )प्रवीण मिरजकर : कृष्णा व्हॅली चेंबरने अनेक वेळा उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणेचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि सांगलीचे कार्यकारी अभियंता यांना वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे कुपवाड औद्योगिक वसाहती मधील संपूर्ण रस्त्यांचे हॉटमिक्स अस्तरीकरण करण्यास अखेर मंजुरी मिळाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश मालू, सचिव गुंडू एरंडोले, संचालक हरिभाऊ गुरव यानी पत्रकार परिषदेत दिली.

मालू म्हणाले की, आम्ही वेळोवेळी कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील रस्ते हे पूर्णपणे खराब झालेले आहेत त्याबाबत आम्ही वेळोवेळी उद्योग मंत्री, पालकमंत्री, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळचे अधिकारी स्थानिक आमदार यांना सदर रस्त्यांचे अस्तरीकरण करण्यात यावे याबाबत पत्रव्यवहार केलेला होता. आम्ही केलेल्या प्रयत्नांना आज अखेर मंजुरी मिळाली आहे. सदर रस्त्यांच्या हॉटमिक्स अस्तरीकरणाला मंजुरी मिळाल्यामुळे उद्योजकांचे व कामगारांचे मोठे नुकसान टळणार आहे. आम्ही केलेल्या पाठपुराव्यास उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार सुधीर दादा गाडगीळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा, मुख्य अभियंता नितीन वानखेडे, अधीक्षक अभियंता सुधीर नागे, कार्यकारी अभियंता इरापा नाईक यांनी जो पाठपुरावा केला त्यामुळे संपूर्ण हॉटमिक्स रस्त्यांच्या अस्तरीकरणाला यश मिळाले आहे. त्याबद्दल आम्ही कृष्णा व्हॅली चेंबर, उद्योजक यांच्या वतीने या सर्वांचे शतशः आभार मानतो.

कृष्णा व्हॅली चेंबर नेहमीच औद्योगिक वसाहती मधील उद्योजकांच्या असणाऱ्या समस्या/अडचणी सोडविण्याचे काम करते, कृष्णा व्हॅली चेंबरकडून अनेक वेळा रस्त्यांचे हॉटमिक्स अस्तरीकरण करण्यात यावे याबाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला होता. अखेर आमच्या पत्रांची दखल घेऊन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने रस्त्यांच्या हॉटमिक्स अस्तरीकरणाला मंजुरी देऊन आम्ही केलेल्या पाठपुराव्यास अखेर यश दिले. रस्त्यांच्या हॉटमिक्स अस्तरीकरणास अखेर मंजुरी मिळाल्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये रस्ते चांगल्या पद्धतीने होतील व उद्योजकांना व कामगारांना रस्त्याअभावी जो त्रास सहन करावा लागत होता त्यातून सुटका मिळेल. सदर हॉटमिक्स रस्ता करण्यामध्ये उद्योगमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून या मोठ्या निधीस मंजुरी दिली त्याबद्दल कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक व कामगार वर्गातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यावेळी उपाध्यक्ष जयपाल चिंचवाडे, रमेश आरवाडे, दीपक मर्दा, रतीलाल पटेल, बाळासाहेब पाटील, अरुण भगत, हेमलता शिंदे, नितीश शहा, रागिणी पाटील, पांडुरंग रूपनर, राजगोंडा पाटील, दिनेश पटेल, व्यवस्थापक अमोल पाटील उपस्थित होते.

Previous Post

ब्रेकिंग | 🔥पंढरपूरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का ; ३०० पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

Next Post

आरक्षणासाठी आंदोलन करणार्‍या मराठ्यांवर पोलिसांची रझाकारी; बेछुट लाठीमार, हवेत गोळीबारने महाराष्ट्र पेटला!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आरक्षणासाठी आंदोलन करणार्‍या मराठ्यांवर पोलिसांची रझाकारी; बेछुट लाठीमार, हवेत गोळीबारने महाराष्ट्र पेटला!

आरक्षणासाठी आंदोलन करणार्‍या मराठ्यांवर पोलिसांची रझाकारी; बेछुट लाठीमार, हवेत गोळीबारने महाराष्ट्र पेटला!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group