• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

BIG BREAKING | Talathi Bharti Exam 2023 : पहिल्याच दिवशी तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटला; नाशिकमध्ये ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार

Admin by Admin
August 18, 2023
in क्राईम, मंत्रालय, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक
1 min read
0
BIG BREAKING | Talathi Bharti Exam 2023 : पहिल्याच दिवशी तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटला; नाशिकमध्ये ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यातील विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार काही केल्या थांबत नसल्याचं चित्र आहे. आता नाशिकमध्ये गुरूवारी घेण्यात आलेल्या तलाठी ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आलं आहे.

या प्रकरणी – म्हसरुळ परिसरातील केंद्राबाहेरून एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन, टॅब आणि हेडफोन करण्यात जप्त करण्यात आले आहेत.

आज राज्यातल्या विविध ठिकाणी तलाठी भरतीसाठी परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. नाशिकमधील म्हसरूळ या ठिकाणी या परीक्षेमध्ये गैरप्रकार घडल्याचं स्पष्ट झालं आहे. एका मोबाईलमध्ये काही संगणकावरील प्रश्नपत्रिकेचे फोटोही आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी एका तरूणाला अटक केली असून यामागे एखादे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संशयिताचे कोणी साथीदार आहेत का याचाही तपास सुरू आहे.

राज्यात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची परीक्षा आजपासून सुरू झाली असून नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वेबईझी इन्फोटेक या परीक्षा केंद्रावर तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा घेतली जात होती. याचवेळी परीक्षा केंद्राच्या बाहेर एक व्यक्ती संशयास्पद रित्या फिरत असल्याच दिसताच त्याची पोलिसांकडून अंगझडती घेण्यात आली. यावेळी त्याच्याकडून एक टॅब, एक वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन, हेडफोन आणि असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये आजच्या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेचे फोटोही मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात येऊन म्हसरूळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे. सदरचा संशयित हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असून परीक्षा केंद्रात तो कोणाला मदत करत होता? त्याचे अजून कोणी साथीदार आहेत का? अशाप्रकारे काम करणारे एखादे रॅकेट कार्यरत आहे का? याचा पोलिसांकडून शोध सध्या सुरू आहे.

दरम्यान, नाशिकसोबत नागपूरमध्येही तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या आधीच जर राज्याच्या गृहमंत्र्यानी दिशाभूल न करता पेपरफुटीवर कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती असंही त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी शाससाने लक्ष द्यावं अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Previous Post

मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणूक अचानक स्थगित; विद्यार्थी संघटना संतप्त

Next Post

🔥मोठी ब्रेकिंग |💥नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
🔥मोठी ब्रेकिंग |💥नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात..

🔥मोठी ब्रेकिंग |💥नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group