गुजरात भाजपाने एक नवं चॉकलेट बाजारात आणलं आहे. या चॉकलेटच्या पॅकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावलेला आहे. हे पौष्टिक न्यूट्रिशन बार सुरूवातीला गुजरात भाजपाचे प्रमुख सी आर पाटील यांनी संसदीय पक्षाची बैठक सुरू होण्यापूर्वी भाजपाच्या मंत्री आणि खासदारांना वाटण्यात आली.
या पॅकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आला असून या एनर्जी बारमधल्या सामग्रीची माहितीही देण्यात आली आहे. भाजपाचे खासदार दुष्यंत सिंग यांनी या न्यूट्रिशन बारबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी हे चॉकलेट खातानाचा फोटोही शेअर केला आहे.
स्वस्थ भारत के निर्माण के लिए देश में महिलाओं एवं बच्चों का योग्य पोषण होना बेहद आवश्यक है। देश के यशस्वी प्रधानमंत्री श्री @narendramodi जी की प्रेरणा से महिलाओं तथा बच्चों के लिए एक स्वास्थ्यवर्धक चॉकलेट… pic.twitter.com/tm6wphFzxB
— Dushyant Singh (@DushyantDholpur) April 4, 2022
गरीब आणि कुपोषित मुलांसाठी भरपूर पोषक तत्व असलेलं हे चॉकलेट तयार करण्यात आलं असल्याचं भाजपाकडून सांगण्यात आलं आहे. इंडिया टुडेने यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

