मिरज दि. २७ : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 19.7 मि. मी. पावसाची नोंद झाली असून मिरज तालुक्यात सर्वाधिक 31.5 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे.
मिरज 31.5 (174.4), जत 19.7 (138.4), खानापूर-विटा 15.1 (105.3), वाळवा-इस्लामपूर 12.9 (192.5), तासगाव 21.5 (177.5), शिराळा 21.7 (489.9), आटपाडी 7.5 (108.3), कवठेमहांकाळ 22.4 (149.1), पलूस 21.1 (162.4), कडेगाव 11 (125.9).

