• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कामगार मंत्र्यांच्या मतदारसंघातील गावात जातीवाद, १५० दलित कुटुंबं गाव सोडून मंत्रालयाकडे जाणार..

Admin by Admin
July 18, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय, सामाजिक
1 min read
0
कामगार मंत्र्यांच्या मतदारसंघातील गावात जातीवाद, १५० दलित कुटुंबं गाव सोडून मंत्रालयाकडे जाणार..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग गावात धक्कादायक घटना घडली. कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या मतदारसंघातल्या बेडग गावात जातीवाद सुरू झाला आहे.

या वादाने त्रस्त झालेल्या गावातील 150 दलित कुटुंबांनी गाव सोडून पायी चालत मुंबई गाठण्याचा आणि राज्य शासनाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सोमवार 17 जुलै 2023 पासून सुरू झाले आहे. सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी अधिवेशन सुरू असल्यामुळे मुंबईत आहेत. याच कारणामुळे दाद मागण्यासाठी मुंबई गाठण्याचा निर्णय बेडग गावातील दलित कुटुंबांनी घेतला आहे.

बेडग येथे दलित समाज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान उभारत होता. ग्रामपंचायतीने कमान बांधण्यासाठी परवानगी दिली होती. पण रविवार 16 जून 2023 रोजी कमान बेकायदेशीर असल्याचे ठरवण्यात आले. ग्रामपंचायतीने बांधकाम सुरू असलेली कमान पाडून टाकली. ही कारवाई झाल्यापासून गावात तणाव आहे. कमान पाडणाऱ्या सरपंचासह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली. या मागणीने जोर धरायला सुरुवात केली आणि काही तासांतच गावातल्या दलित समाजावर जातीयवादी असल्याचा आरोप सुरू झाला. गावात होणाऱ्या त्रासाला वैतागून 150 दलित कुटुंबांनी गाव सोडून पायी चालत मुंबई गाठण्याचा आणि राज्य शासनाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला. ही मंडळी आज (मंगळवार 18 जुलै 2023) आपला संसार सोबत घेऊन मुंबईच्या दिशेने पायी चालण्यास सुरुवात करतील. जिथे जातीवाद नसेल अशा गावात पुनर्वसन करा अशी मागणी ग्रामस्थ करणार आहेत. गाव सोडत असल्याचे पत्र बेडग ग्रामस्थांच्यावतीने सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

बेडग गाव हे राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या भाजपच्या सुरेश खाडे यांच्या मतदारसंघात आहे. यामुळे गावातील घडामोडींना अधिकच महत्त्व आले आहे. या प्रकरणात राज्य शासन काय करणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

Previous Post

सांगलीत मुलांना अन्नातून विषबाधाप्रकरणी महिला बचत गटावर फौजदारी..

Next Post

इचलकरंजीत खळबळ | माजी आमदाराच्या मुलाच्या वाहनासहित १० चारचाकी दगड घालून फोडल्या ; लिगाडे मळा परिसरात युवकांचा धुडगूस

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
इचलकरंजीत खळबळ | माजी आमदाराच्या मुलाच्या वाहनासहित १० चारचाकी दगड घालून फोडल्या ; लिगाडे मळा परिसरात युवकांचा धुडगूस

इचलकरंजीत खळबळ | माजी आमदाराच्या मुलाच्या वाहनासहित १० चारचाकी दगड घालून फोडल्या ; लिगाडे मळा परिसरात युवकांचा धुडगूस

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group