• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाडमधील दर्गा परिसरातील विकास कामाला सुरुवात

दर्ग्याच्या बाहेरील बाजूस फरशी बसवण्यासाठी निधी मंजूर करण्यात नगरसेवक मगदूम यांचे यशस्वी प्रयत्न.

Admin by Admin
July 5, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
कुपवाडमधील दर्गा परिसरातील विकास कामाला सुरुवात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुपवाड प्रतिनिधी : प्रवीण मिरजकर – कुपवाड शहरातील प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक गजानन मगदूम यांच्या प्रयत्नातुन मंजुर करण्यात आलेल्या ग्रामदैवत हजरत लाडले माशायक दर्ग्याच्या बाहेरील बाजूस फरशी बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. या कामाची पाहणी करण्यासाठी शेखर इनामदार आले होते. यावेळी इतर समस्यां जाणून घेतल्या. दर्गा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी शासना मार्फत योग्य तो निधी देऊन विकास केला जाईल अशी ग्वाही शेखर इनामदार यांनी दिली. दर्गा कमिटीच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

दर्ग्याच्या मुख्य इमारती बाहेरील बाजूची फरशी कमकुवत झाल्याने इमारतीत माती पडण्याचा संभव होता, बाहेरील बाजूस फरशी बसविण्यासाठी दर्गा कमिटीच्यावतीने नगरसेवक मगदूम यांना निवेदन दिले होते.नगरसेवक मगदूम यांनी या कामाचा पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला व या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला.

यावेळी नगरसेवक मगदूम यांच्या हस्ते शुभारंभ केला. प्रसंगी दर्गा कमिटीचे सरपंच बशीर मुजावर, आयनुद्दीन मुजावर, सलीम मुजावर, सायबुद्दीन मुजावर, पिंटू मुजावर गौस मुजावर ,माजी उपमहापौर जाधव, सामाजिक कार्यकर्ते रासकर,सुभाष जमदाडे, जमीर रंगरेज, मुस्ताक रंगरेज, पैलवान महादेव मगदूम, ज्येष्ठ मार्गदर्शक शौकत भाई,संन्मती गोंडाजे, तानाजी व्हनकडे, रफीक मुजावर काशीम मुजावर तानाजी गडदे, राजू पाटील, अरुण रुपनर, विजय खोत, राजू पैलवान मुजावर अब्बास मुजावर, रऊफ मुजावर, शिराज मुजावर, अस्लम मुजावर, कलंदर मुजावर, नवाज मुजावर, निहाल मुजावर, शिकंदर मुल्ला, नजीर ढालाईत,माशूम मकानदार, मैनुद्दीन मुजावर, झाकीर मुजावर, अख्तरहुसेन मुजावर, सरफराज मुजावर ,मन्सूर मुजावर,समीर गौस मुजावर, शब्बीर मुजावर, जहाँगीर मुजावर,गणी मुजावर,मोहसीन मुजावर,शकील मुजावर,जाबर मुजावर, बापूसो तोडकर, भाऊसाहेब पाटील तसेच दर्गा कमिटीचे पंच यांच्यासह अनेक मुस्लिम युवा व जेष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Previous Post

पोलिस कर्मचाऱ्याविरोधात बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Next Post

मिरजेतील ज्येष्ठ शस्त्रक्रियातज्ञ बी. डी. पुजारी यांचे निधन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेतील ज्येष्ठ शस्त्रक्रियातज्ञ बी. डी. पुजारी यांचे निधन

मिरजेतील ज्येष्ठ शस्त्रक्रियातज्ञ बी. डी. पुजारी यांचे निधन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group