• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पृथ्वीराज पाटील यांच्या कामाचे सुरेशभाऊ खाडेंकडून कौतुक

पालकमंत्री यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर पुतळा ते मिरज – सांगली रस्त्याचे उद्घाटन

Admin by Admin
May 21, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
पृथ्वीराज पाटील यांच्या कामाचे सुरेशभाऊ खाडेंकडून कौतुक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते मिरज – सांगली रोड या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन पालकमंत्री तथा कामगार मंत्री ना. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते व सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात पृथ्वीराज पाटील यांनी नगर विकास मधून दहा कोटींचा निधी मंजूर करून आणला होता. त्यातील दोन कोटींच्या निधीतून या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.

यावेळी ना. खाडे यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. पालकमंत्री म्हणून सर्वांना समान न्याय देतोय. आम्ही विकास कामात एकत्र आहोत, या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन हे उद्घाटन केले आहे, हे त्याचे प्रतीक आहे. कुपवाड येथेही समाज मंदिराचे भूमिपूजन मी आणि पृथ्वीराज बाबांनी एकत्रित काम केले आहे. मिरजेतील ड्रेनेजच्या कामाबाबत आयुक्तांशी चर्चा झाली असून अतिरिक्त निधी देऊन ते काम पूर्ण केले जाईल. सर्व नगरसेवकांना मी फंड दिला आहे, तसेच पुढील कामाकरता प्रस्ताव मागवले आहेत.

पृथ्वीराज पाटील म्हणाले, या रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात हॉस्पीटल आहेत, त्यामुळे रुग्णांच्यासाठी व शैक्षणिक संकुले असल्यामुळे हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा होता, मिरज सांगली या शहरांना जोडणाराही हा रस्ता आहे, त्यामुळे वाहतुकीची सोय चांगली होणार आहे.

यावेळी मोहन व्हनखडे, माजी महापौर किशोर जामदार, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, राष्ट्रवादी गटनेते मैनुद्दिन बागवान, नगरसेवक गणेश माळी, आनंदा देवमाने, पांडुरंग कोरे, नगरसेविका सौ.संगीता खोत, सौ. गायत्री कल्लोळी, माजी नगसेवक विठ्ठल खोत, अल्लाउद्दीन काझी, गजेंद्र कल्लोळी, बाबासाहेब अळतेकर, डॉ. विनोद परमशेट्टी, डॉ. प्रताप भोसले, डॉ. शरद देसाई, डॉ. राजेंद्र मेथे, सनी धोतरे, अय्युब निशानदार, सतीश अण्णा सावंत, विजय बसरगी, अशोकासिंग राजपूत, अरूण गवंडी, प्रशांत चव्हाण, अशोक पवार, कॉन्ट्रॅक्टर अभिशेख पाटील, बसगोंडा कबाडे, उपस्थित होते.

Previous Post

भाजप नेत्यांना जबाबदार धरत तरूणीचे विषप्राशन

Next Post

HSC Board Result Date: प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे पाहता येणार निकाल?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
HSC Board Result Date: प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे पाहता येणार निकाल?

HSC Board Result Date: प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे पाहता येणार निकाल?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group