• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मुंढव्यात ज्येष्ठ नागरिकाचा खून करणाऱ्या कोयता गँगची पोलिसांनी काढली धिंड

Admin by Admin
May 12, 2023
in क्राईम
1 min read
0
मुंढव्यात ज्येष्ठ नागरिकाचा खून करणाऱ्या कोयता गँगची पोलिसांनी काढली धिंड
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पुणे : मुंढव्यातील केशवनगर परिसरात ज्येष्ठ नागरिकाचा खून करणाऱ्या कोयता गँगमधील सहा आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. मुंढवा भागातील केशवनगर परिसरात ३० एप्रिल रोजी रवींद्र दिगंबर गायकवाड (वय ५९, रा.केशवनगर, मुंढवा) यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी आकाश अशोक जावळे, सागर आकाश जावळे, साहिल भीमाशंकर सुतार, सनी विनायक चव्हाण, नागनाथ ऊर्फ हरी विठ्ठल पाटील, रोहित दत्तात्रय घाडगे यांना अटक करण्यात आली होती.

गायकवाड यांचा खून झाल्यानंतर मुंढवा-केशवननगर भागातील या घटनेचा निषेध करून बंद पाळला होता. व्यावसायिकांनी दुकाने बंद केली होती. गायकवाड व्यावसायिक होते. त्यांच्या घराजवळ आरोपी शिवीगाळ, तसेच आरडाओरडा करत होते. आरोपींना गायकवाड यांना समजावून सांगितले. त्यानंतर आरोपी जावळे, सुतार, पाटील, घाडगे यांनी गायकवाड यांच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता.

गायकवाड यांचा खून करणारे सहा आरोपी पोलीस कोठडीत आहेत. ज्या ठिकाणी आरोपींनी गायकवाड यांचा खून केला. त्या भागातून सहा आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. गुंडाची दहशत मोडीत काढण्यासाठी धिंड काढल्याने परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले. कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे, तसेच दहशत माजविणाऱ्या गुंडांच्या विरुद्ध पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी दहशत माजविणाऱ्या गुंडांची माहिती पोलिसांना द्यावी. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी सांगितले.

Previous Post

बोरघाट उतरताना ब्रेक फेल, चालकाचा ताबा सुटला अन् ट्रक पलटला; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात

Next Post

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील आरोप मागे, निलंबनही रद्द; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव ; एक रुग्ण आढळला

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील आरोप मागे, निलंबनही रद्द; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group