• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अवैध गौण खनिज वरती कडेगाव तहसीलने फास आवळला

चार दिवसांत तीन कारवाया

Admin by Admin
May 11, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली : वाळूचोरीची बोगस चौकशी ; “त्या” तहसीलदारासह पंचनामा करणाऱ्या पथकाचीच होणार चौकशी.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कडेगाव:- कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांनी कार्यभार स्वीकारताच आपल्या धडाकेबाज कामगिरीने तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांना धडा शिकवला आहे. गेल्या चार दिवसात शेलार यांचे नेतृत्वाखाली अवैध वाळू वाहतूक करणारी दोन तर अवैध मुरूम उत्खनन करणारं एक वाहन जप्त करण्यात आलं आहे. एकूणच कडेगाव तहसील ने अवैध गौण खनिज वरती फास आवळल्याचे स्पष्ट होत आहे.

कडेगाव तालुका म्हणजे अवैध गौण खनिज उत्खननाचे माहेरघर झालं होतं. अवैध गौण खनिज वाहतुकीवरून येरळा काठचे शेतकरी आणि वाळू तस्करांमध्ये कित्येकदा वाद झाले शेतकऱ्यांना वाळू तस्करांकडून मारहाण ही झाली. मागील वर्षी तर वाळू तस्करांकडून पत्रकाराला मारहाण झाली आणि तालुक्यातील अवैध गौण खनिज चा मुद्दा मंत्रालयात पोहचला. याचं कारण होत प्रशासनाचे झारीतील शुक्राचार्य. अवैध वाळू उपसा झाल्यानंतर येरळा काठचे शेतकरी प्रशासनास कळवायचे मात्र ही बातमी वाळू तस्करांना मिळायची आणि वाद/तंटे व्हायचे. मात्र तालुक्यात नवनियुक्त तहसीलदार अजित शेलार यांनी कार्यभार स्वीकारताच अवैध गौण खनिज वाल्यांचे कंबरडे मोडण्याचा विडा उचलला आहे असं स्पष्ट होत आहे. कारण शेलार यांना अजून याठिकाणी एक महिना ही झाला नाही तोपर्यंत त्यांनी अवैध गौण खनिजवरती फास आवळण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये वडिये रायबाग येथून एक अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर, मोहिते वडगाव येथून एक अवैध मुरूम वाहतूक करणारा ट्रॅक्टर तर शिवणी खेराडे वांगी रस्त्यावर एक अवैध वाळू वाहतूक करणारे पीक अप जप्त करण्यात आलं आहे.

तालुक्यातील नेवरी, आंबेगाव, भिकवडी, वडिये रायबाग, शिवणी, शेलकबाव आणि वांगी येथून हमखास अवैध वाळू तस्करी चालते. काही ठिकाणी तस्करांचे स्थानिक प्रशासनाशी घनिष्ठ संबंध असल्याचं बोललं जात आहे. मात्र आता स्वतः तहसीलदारच मैदानात उतरल्याने अवैध गौण खनिज वाल्यांचे तसेच प्रशासनातील भ्रष्ट लोकांचे धाबे दणाणले आहेत. तालुक्यातील येरळा नदीचा सहवास वरदान असताना तो अवैध वाळू उपशामुळे श्राप वाटू लागला होता मात्र शेलार याच्या सुरुवातीलाच धडाकेबाज कारवाई ने
येरळा काठचा शेतकरी सुखावला असून ही झालेली सुरुवात अशीच चालावी व तालुक्यातील अवैध गौण खनिज उपसा व वाहतूक थांबावी अशी मागणी होत आहे.

Previous Post

सांगली | नीट परीक्षा वेळी विद्यार्थ्यांना उलटे कपडे घालायला लावले

Next Post

मोठी बातमी | जयंत पाटील यांना ईडीची नोटीस..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | जयंत पाटील यांना ईडीची नोटीस..

मोठी बातमी | जयंत पाटील यांना ईडीची नोटीस..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group