• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकींग | लॉजवर महिलेचा मृतदेह ; आटपाडीत सर्वत्र खळबळ

Admin by Admin
May 6, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकींग | लॉजवर महिलेचा मृतदेह ; आटपाडीत सर्वत्र खळबळ
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

आटपाडी; खबऱ्या प्रतिनिधी : आटपाडी शहरातील एका लॉजवर सत्तावीस वर्षीय महिलेचा मृतदेह आज (दि. ६) सकाळी आढळून आला. छाया मधुकर देवडकर (वय २७, रा. विठ्ठलनगर, आटपाडी) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे.

याबाबत एका संशयितास आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आटपाडी शहरातील एका लॉजमध्ये गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास छाया देवडकर व नानासो हणमंत देवडकर (वय ३३, रा. पिंजारी वस्ती, निंबवडे) राहण्यासाठी आले होते. त्यांनी खोली बूक केली होती. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून ते खोली बाहेर आले नव्हते. हॉटेल कर्मचाऱ्यांनीही दरवाजा उघडून पाहिलेला नव्हता. दरम्यान, शनिवारी सकाळी खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी खोलीचा दरवाजा उघडून पाहिला असता छाया देवडकर हिचा मृतदेह आढळून आला.

त्यानंतर लॉजची खोली बुक केलेल्या नानासो देवडकर याला संशयित म्हणून आटपाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक एस. व्ही.वर्धन करत आहेत. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल.

Previous Post

तासगांव मधील जीवन विकास संस्थेचे अध्यक्ष एल.डी.म्हेत्रे यांचेवर विनयभंगाचा गुन्हा

Next Post

मिरजेत चोरी करणाऱ्या तिघांना अटक ; दीड लाखांचा माल जप्त ; एलसीबीची कारवाई

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत चोरी करणाऱ्या तिघांना अटक ; दीड लाखांचा माल जप्त ; एलसीबीची कारवाई

मिरजेत चोरी करणाऱ्या तिघांना अटक ; दीड लाखांचा माल जप्त ; एलसीबीची कारवाई

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group