• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अवैध वाळू तस्करी प्रकरणी पकडलेले वाहन कार्यालयातून पळवले

कडेगाव तहसील कार्यालयातून वाहने चोरीला जाण्याचा सिलसिला पुन्हा सुरू?

Admin by Admin
May 6, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव ; एक रुग्ण आढळला
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तहसीलदार अजित शेलार यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष

कडेगाव:- अवैध वाळू वाहतूक प्रकरणी वांगी मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई करून तहसील कार्यालयात आणून लावलेला ट्रॅक्टर पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली असून तहसील कार्यालयाच्या आवारातून वाहने पळण्याच्या थांबलेल्या घटना पुन्हा सुरू झाल्या की काय? आणि घटनेनंतर नवनिर्वाचित तहसीलदार अजित शेलार काय भूमिका घेतात? असे प्रश्न तालुक्यातील जनतेसमोर पडले आहेत.

वांगी मंडळ अधिकारी यांचे पथकाने शुक्रवारी मध्यरात्री अवैध वाळू वाहतूक करीत असताना एक ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात आणून लावला होता. ट्रॅक्टर कार्यालयात आणून लावल्या नंतर पथक पुन्हा टेहळणीसाठी गेले होते त्यानंतर पाठीमागे संबंधित वाहन पळवून नेण्यात आले. ही घटना शनिवारी सकाळी निदर्शनास आली. तहसीलदार कार्यालयाच्या आवारातून पाहणे पळविणे अथवा चोरून नेण्याच्या घटना यापूर्वीच्या तहसीलदारांच्या कार्यकाळात बऱ्याच वेळा घडल्या होत्या. यात गुन्हे दाखल झाले आहेत मात्र वाहन मालक कोर्टातून वाहने सोडवून नेत आणि महसूल प्रशासनाचा दंड वसूल होत नसे तसेच सुधारित परिपत्रकानुसार संबंधित वाहन व मालक यांचेवर कारवाई करणेचे राहून जात असे. त्यानंतर तत्कालीन तहसीलदार यांनी कोर्टाशी पत्रव्यवहार करून कार्यालयातुन चोरीला गेलेले वाहन हे तहसील प्रशासनाच्या ताब्यात द्यावे अशी विनंती केली होती. त्यानंतर कार्यालय परिसरातून वाहने चोरीला जाण्याचा प्रकार थांबला होता.

आता नवनिर्वाचित तहसीलदार अजित शेलार यांचे कार्यकाळात ही पहिलीच घटना असून शेलार काय भूमिका घेतात यावरून त्याची आगामी काळातील अवैध वाळू तस्करी व त्यावरील कारवाई बाबतची भूमिका स्पष्ट होईल.

Previous Post

ब्रेकिंग! 11 मे नंतर नवीन सरकार स्थापन होणार? कायदेतज्ञांच्या ‘त्या’ ट्विटने उडाली राजकारणात खळबळ

Next Post

तासगांव मधील जीवन विकास संस्थेचे अध्यक्ष एल.डी.म्हेत्रे यांचेवर विनयभंगाचा गुन्हा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पोलिस निरीक्षक निंभोरे साहेब, तालुक्यातील अवैध धंदे अगोदर बंद करा..!

तासगांव मधील जीवन विकास संस्थेचे अध्यक्ष एल.डी.म्हेत्रे यांचेवर विनयभंगाचा गुन्हा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group