• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

नेवरीच्या मैदानात पहिल्या क्रमांकाची कुस्ती सोडवली

कुस्ती शौकीन नाराज

Admin by Admin
May 1, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
नेवरीच्या मैदानात पहिल्या क्रमांकाची कुस्ती सोडवली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कडेगाव:- तालुक्यातील नेवरी येथील श्री सिध्दनाथ रथोत्सवा निमित्त आयोजित भव्य अशा कुस्ती मैदानातील पहिल्या क्रमांकाची आणि एक लाख एक्कावन्न हजार रूपये इनामाची पै.पोपट घोडके विरुद्ध पै.हसन पटेल यांच्यातील कुस्ती पै घोडके यांचा स्नायू दुखावल्याने सोडवण्यात आल्याने येथे निकाली कुस्त्या पाहण्यासाठी आलेल्या कुस्ती शौकिनांची नाराजी झाली. मुळात ही कुस्ती उप महाराष्ट्र केसरी पै अक्षय शिंदे व पै हसन पटेल यांच्यात होणार होती मात्र पै शिंदे यांच्या गुढघ्याला इजा झाल्याने पै शिंदे मैदानास हजर राहू शकले नाहीत.

येथील श्री छत्रपती शिवाजीराजे क्रीडांगणावर निकाली कुस्त्यांची परंपरा आहे. यात्रा कमिटीच्या व काही दानशूर लोकांच्या सहाय्याने आयोजित कुस्ती मैदानामध्ये नामवंत पैलवानाच्या निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चांगदेव महाडीक व कु.अश्विना महाडीक यांच्यावतीने एक लाख एक्कावन्न हजार रुपये इनामाची प्रथम क्रमांकाची कुस्ती उप महाराष्ट्र केसरी पुणे पै.अक्षय शिंदे हजर नसल्यामुळे पै.पोपट घोडके विरुद्ध पै.हसन पटेल यांच्यात लढवण्यात आली मात्र पै घोडके यांचा स्नायू दुखावल्याने ती सोडवण्यात आली.

निकाली कुस्ती पहावयास न मिळाल्यामुळे कुस्ती शौकीन नाराज झाले. द्वितीय क्रमांकाची एक लाख पंचवीस हजार रुपये इनामाची कुस्ती आदर्श कुस्ती संकुल, विटाचे पै. अभिजीत मोरे विरुद्ध पवार तालीम सांगलीचे पै.बाळू अपराध यांच्यात झाली या कुस्तीमध्ये पै.अभिजीत मोरे यांनी दसरंगी डावावरती विजय मिळवला. तिसच्या क्रमांकाची एक लाख एक हजार रुपये इनामाची कुस्ती कडेगावचे पै. वैभव रासकर विरुद्ध पवार तालीम सांगलीचे पै. सागर काळेबाग यांच्यामध्ये झाली या कुस्तीमध्ये पै. वैभव रासकर यांनी कला जंगी डावावरती पै. सागर काळेबाग यांना चितपट केले. चौथ्या क्रमांकाची बेनापुर पै खाशाबा मदने विरुद्ध कोल्हापूर पै.लिंगराज होनमाने यांच्यामध्ये पै.लिंगराज होनमाने विजय ठरले. पाचव्या क्रमांकाची कुस्ती राष्ट्रकुल विटा पै.उदय खांडेकर विरुद्ध भिकवडी बुद्रुक पै दशरथ तामखडे यांची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. सहाव्या क्रमांकाची कुस्ती राष्ट्रकुल विटा पै.सागर सूर्यवंशी विरुद्ध लेंगरे पै.रोहिते गुजले यांच्यामध्ये उल्टी डावावर पै.सागर सूर्यवंशी हे विजयी झाले.

मैदानावर दीडशेहून अधिक कुस्त्या चटकदार झाल्या. निवेदक परशुराम पवार यांनी उत्कृष्ट निवेदक केले. यावेळी हिंदकेसरी पै.संतोष वेताळ पै.प्रकाश जगताप वडिये रायबाग आप्पा पाटील विटा पै.मधुकर कांबळे पै.शिवाजी महाडीक पै. सुशांत सावंत पै. श्रीरंग गोरड पै. विश्वास सूर्यवंशी पै. सोमनाथ यमगर पै. सोनू सुतार पै. रामचंद्र कुंभार उपस्थित होते.

Previous Post

मोठी ब्रेकींग | खासदार संजय काकांच्या पॅनलचा पराभव, राष्ट्रवादीची सत्ता कायम ; आमदार पडळकरानी कांनशिलात मारल्याने आटपाडीत तणाव

Next Post

नागज फाट्यावर १ कोटी १७ लाखांचा गुटखा पकडला; दोन कंटेनर जप्त, तिघांच्या आवळल्या मुसक्या..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
नागज फाट्यावर १ कोटी १७ लाखांचा गुटखा पकडला; दोन कंटेनर जप्त, तिघांच्या आवळल्या मुसक्या..

नागज फाट्यावर १ कोटी १७ लाखांचा गुटखा पकडला; दोन कंटेनर जप्त, तिघांच्या आवळल्या मुसक्या..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group