• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आष्टा येथे होणार एमआयडीसी

Admin by Admin
April 19, 2023
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
आष्टा येथे होणार एमआयडीसी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

आष्टा; खबऱ्या प्रतिनिधी / हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शाहूवाडी (जि. कोल्हापूर) व आष्टा (जि. सांगली) या दोन ठिकाणी एमआयडीसीला शासनाच्या उद्योग विभागाने मंगळवारी तत्वता मान्यता दिली.

मुंबई येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. खासदार धैर्यशील माने यांच्या मागणी नुसार ही बैठकीत आयोजिली होती.

शाहूवाडीसह हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील आष्टा (ता. वाळवा) येथे एमआयडीसी व्हावी, अशी सुशिक्षित बेरोजगार तरुणांची खूप वर्षापासूनची मागणी होती. या एमआयडीसीसाठी खासदार माने प्रयत्नशील होते. मजले (ता. हातकणंगले) येथे नियोजित पोर्ट करिता जमीन एमआयडीसी मार्फत महामार्ग प्राधिकरणला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधितांना विभागणी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्याची माहिती खासदार माने यांनी दिली.

उद्योग विभागाच्या अधिकार्‍यांसह कोल्हापूर व सांगलीच्या जिल्हाधिकार्‍यांना जागेची पाहणी करण्याचे आदेश दिलेे आहेत. त्यानुसार गुरुवार 20 एप्रिलरोजी शाहूवाडी, आष्टा तसेच मजले येथील जागेची पाहणी केली जाणार आहे. शाहूवाडी हा दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. येथील तरुणांना मुंबई येथे रोजगारासाठी जावे लागत आहे. या तरुणांना या आपल्याच तालुक्यात रोजगार मिळावा, यासाठी एमआयडीसीची मागणी होत होती.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील मजले येथे शासनाच्या गायरान जमिनी मध्ये सॅटेलाईट पार्क उभारण्याची मागणी खासदार माने यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केली.

Previous Post

सर्वात मोठी बातमी! शरद पवार यांचा राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदाराला फोन

Next Post

ब्रेकिंग! राज्य सरकार बरखास्त करा, काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याने केली मागणी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग! राज्य सरकार बरखास्त करा, काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याने केली मागणी

ब्रेकिंग! राज्य सरकार बरखास्त करा, काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याने केली मागणी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group