१) सोयाबीन दर झाले स्थिर (Soybean Rate):
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या चढउतार सुरू आहे यामध्ये सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंड हे पदार्थ आहेत. त्याचबरोबर सरासरी तर पातळी देखील काय माहिती. सध्या सोयाबीनचे वायदे 14.24 डॉलर प्रतिबुशेल्स तर सोयाबीन तेल 53.64 सेंट प्रति पाउंड आणि सोयापेंड चे वायदे 443 डॉलर प्रति टनावर वर पोहोचले आहेत.
सोयाबीनचे दर देशातील बाजारात 5000 ते 5300 रुपयावर टिकूनच आहे. सोयाबीन खूप दिवस देशातील बाजारात दबावात नाही राहणार. त्याच्या दरामध्ये सुधारणा दिसू शकते, अशा प्रकारचा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी वर्तवला आहे.
२) कापसाच्या आवक चा दबाव कायम (Cotton Rate):
कापसाचे भाव देशातील बाजारात नरमलेल्या पातळीवर आहे काय माहित. देशात कापसाचे आवक मार्च महिन्यात वाढल्यानंतर दर दबावात आले आहेत. त्याचसोबतच आंतरराष्ट्रीय बाजारतील बँकिंग क्षेत्रातील काही अडचणीमुळे कापसाचे दरात घट झाले आहे.
कापसाचे फायदे सध्या 77 सेंट प्रती पाउंड च्या आसपास आहेत. तर कापसाला देशात 7700 ते 8100 एवढाच भाव मिळतो.
देशामध्ये कमी होत असलेले उत्पादन आणि वाढलेला वापर यामुळे आवकेचा दबाव थोडा कमी झाल्यानंतर दरामध्ये सुधारणा होऊ शकते, हा अंदाज कापूस बाजारातील तज्ञ अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
३) उडदाच्या भावाला मिळाली तेजी (Urad Rate):
देशामध्ये तुरीनंतर आता उडदाचे भाव तेजीत आलेले आहेत. उडदाच्या उत्पादनामध्ये देशात खूप मोठी घट झाली आहे. त्याचबरोबर तुरीची आयात ही मर्यादित राहिली आहे. याचवेळी दुसरीकडे उडदाच्या दरामध्ये चांगला उठाव झाला आहे. त्यामुळे उडदाला चांगला दर मिळाला आहे.
उडदाला सरासरी सध्या सात 7500 ते 8000 रुपये असं चांगला भाव मिळत आहे. तसेच पुढील काळातही उडीद घरातील तेजी कायम राहील, हा अंदाज उडीद बाजारातील काही तज्ञ अभ्यासकांनी सांगितला आहे.
४) गवार दरात मोठी वाढ:
मागील काही दिवसापासून गवारीचे देशातील बाजारात तेजीत आहेत. बाजारात गावाची आवक तशी कमीच आहे परंतु त्याच्यात दरामध्ये चांगला उठाव आहे. आपल्या राज्यात बाजारामध्ये गवारची सरासरी आहोत शंभर क्विंटल पेक्षाही कमी आहे.
आणि यामुळे गवारला चांगला भाव मिळत आहे सरासरी 6000 ते 7000 रुपये भाव मिळतोय. गवारची आवक पुढील काही दिवसात मर्यादितच राहील असा अंदाज आहे. त्यामुळे त्याचे दरही चांगलेच राहतील. अशा प्रकारचा अंदाज बाजारातील भाजीपाला अभ्यासकांनी व तज्ञांनी व्यक्त केला आहे.
५) तुरीला भाव काय? (Tur Rate):
तुरीचे दर देशातील बाजारात चांगलेच तेजीत आहेत. परंतु सध्याचा काळ बाजार समितीमध्ये आवकेचा आहे. सध्याची आवक जरा जास्तच आहे. त्यातच आताच लग्न सराईमुळे तुरीच्या दरामध्ये चांगलाच उठाव मिळत आहे. व्यापारी देशातील ही स्थिती लक्षात घेऊन तुरीची खरेदी करत आहेत.
संग्रही म्हणजे उत्पादन साठवून ठेवणारे देखील काही प्रमाणामध्ये सक्रिय दिसत आहेत. त्यामुळे तुरीच्या घरामध्ये चांगली तेजी आलेली आहे. तुरीने देशातील काही बाजारांमध्ये सध्या 9000 रुपये चा टप्पा देखील गाठलेला आहे. त्यामध्ये कर्नाटक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही बाजारांमध्ये तुरीची दर या पातळीपर्यंत पोहोचलेले आहेत. हा भाव जास्तीत जास्त भाव आहे.
कमी मालाला देखील चांगला भाव आहे पण यातून तुरीला एक दिशा स्पष्ट होते. सरकारची देखील बाजारात हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. सरकार तुरीच्या घरात जास्त वाढ झाल्यास एखादा निर्णय घेऊ शकतील.
सरकारने यापूर्वीच आयात शुल्क काढले होते, व्यापारी,स्टॉकिस्ट आणि मिलर्स यांच्याकडून स्टॉकची माहिती घेतली व राज्याकडून देखील माहिती घेतली. परंतु एवढे सगळे करून देखील तुरीचे दर चांगलेच तेजीत आहेत.
जरी यापुढे सरकारने कोणताही निर्णय घेतला तरी तुरीचे दर सरासरी 8000 ते 9000 रुपयांच्या दरम्यानच राहतील, अशा प्रकारचा अंदाज तुर बाजारातील काही तज्ञ आणि अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

