• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

द्राक्ष व्यापाऱ्याचे एक कोटी रुपये लुटले, तासगावात मारहाण करून रोकड लांबवली.

Admin by Admin
March 29, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
पोलिस निरीक्षक निंभोरे साहेब, तालुक्यातील अवैध धंदे अगोदर बंद करा..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

तासगाव : शहरातील सांगली रस्त्यावरील गणेश कॉलनी येथे अंधाराचा फायदा घेत द्राक्ष व्यापाऱ्याकडील तब्बल एक कोटी दहा लाख रुपये लुटण्यात आले.

महेश शीतलदास केवलानी (रा. नाशिक) असे लुटण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास मोटार अडवत व्यापाऱ्यासह इतर दोघांना मारहाण करून चोरट्यांनी ही लूट केली.

तासगावातील गणेश कॉलनी येथील एका ‘रो हाऊस’मध्ये नाशिक येथील द्राक्ष व्यापारी महेश शीतलदास केवलानी भाड्याने राहण्यास आहेत. ते तासगाव शहरासह तालुक्यातील द्राक्षे गेल्या चार-पाच वर्षांपासून खरेदी करत आहेत. ही द्राक्षे ते बांगलादेश येथे पाठवतात. यावर्षीही ते द्राक्षे खरेदी करून पाठवत आहेत. याच द्राक्षांचे पैसे आणण्यासाठी ते मंगळवारी मोटारीतून चालक व दिवाणजीसोबत सांगली येथे गेले होते.

पैसे घेऊन ते गणेश कॉलनीकडे येत होते. सायंकाळी सव्वासातच्या दरम्यान गणेश कॉलनी येथील रस्त्यावर ते आले. वीज गेल्याने दिवे बंद असल्याने अंधार होता. त्याचवेळी त्यांच्या मोटारीसमोर अचानक दुचाकीवरून दोघे अज्ञात आले. त्यांनी दुचाकी आडवी लावली. मोटारीचा वेग कमी होताच परिसरात दबा धरून बसलेल्या अन्य पाच ते सातजणांनी मोटारीला घेरले.

काही समजण्याच्या आतच टोळक्यातील एकाने मोटार चालकास हत्याराचा धाक दाखवून रोखले, तर इतरांनी मागे बसलेल्या केवलानी व दिवाणजी यांना गाडीतून खाली जबरदस्तीने उतरवले. त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. याचवेळी केवलानी यांच्याजवळची पैशाची बॅग हिसकावून घेतली. ती एक कोटी दहा लाख रुपयांची रक्कम घेऊन आठ ते दहा चोरटे वेगवेगळ्या दिशेने पसार झाले. केवलानी आणि सोबतच्या दोघांनी आरडाओरडा केल्यानंतर लोक जमा झाले.

पाळत ठेवून लूट

द्राक्ष व्यापारी केवलानी सांगलीतून मोठी रक्कम घेऊन आले होते. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत हा प्रकार घडल्याने त्यांच्यावर पाळत ठेवूनच ही चोरी करण्यात आल्याचा अंदाज आहे.

Previous Post

मोठी बातमी : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता.? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचे विधान..

Next Post

सांगली | पोलीस ठाण्यात आत्मदहनाचा दोन महिलांचा प्रयत्न

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पोलिस निरीक्षक निंभोरे साहेब, तालुक्यातील अवैध धंदे अगोदर बंद करा..!

सांगली | पोलीस ठाण्यात आत्मदहनाचा दोन महिलांचा प्रयत्न

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group