• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडे 79 अर्ज

Admin by Admin
February 22, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडे 79 अर्ज
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी : जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडे दि. 22 डिसेंबर 2022 पासून दि. 10 फेब्रुवारी पर्यंतच्या कालावधीत या कक्षाकडे 79 अर्ज प्राप्त झाले आहेत.

त्यापैकी 23 अर्जांची निर्गत करण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव मंत्रालय मुंबई यांच्या कार्यालयाला 11 अर्ज दाखल झाले आहेत. 45 अर्ज शिल्लक आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय सांगली व त्या अधिनस्त तहसील व उपविभागीय कार्यालये यांच्याशी संबंधित 22, पोलिस अधीक्षक सांगली 12, जिल्हा परिषद सांगली 8, भूमिअभिलेख 7, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका 4, सहायक कामगार आयुक्त, अन्न औषध प्रशासन, उपप्रादेशिक परिवहन, जिल्हा शल्य चिकित्सक, मुद्रांक जिल्हाधिकारी, नगरभूपापन, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्याधिकारी विटा यांच्याशी संबंधित प्रत्येकी एक, शासकीय दुग्ध योजना मिरज, जिल्हा उपनिबंधक सांगली यांच्याशी संबंधित प्रत्येकी दोन, महावितरण सांगलीशी संबंधित तीन असे विभागनिहाय अर्ज प्राप्त झाले आहेत.

विविध विभागांबाबत अर्ज

भूसंपादन मोबदला, नैसर्गिक आपत्ती व नुकसान भरपाई, दस्तनोंदणी, रस्त्यावरील अतिक्रमण काढणे, जातीचा दाखला, रेशनकार्डवरील धान्य, पोलिस संरक्षण, अवैध व्यवसाय, रस्ता बांधकाम, गायरान जमिनीवरील अतिक्रमण, वारसदारास पेन्शन, जमीन मोजणी, दूषित पाणी पुरवठा, दूध भेसळ, मिळकत हस्तांतरण, निवृत्ती वेतन, वीज दर सवलतीचे सुसूत्रीकरण, चुकीच्या पद्धतीने निविदा काढणे आदीबाबतच्या अर्जाचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी सांगितले.

Previous Post

बारावी बोर्डाच्या पहिल्याच पेपरमध्ये त्रुटी ; विद्यार्थ्यांना न्याय देणार : शिक्षणमंडळाचे स्पष्टीकरण.

Next Post

विट्यात राज्य विद्यापीठीय सेवक कृती समितीचे काम बंद आंदोलन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
विट्यात राज्य विद्यापीठीय सेवक कृती समितीचे काम बंद आंदोलन

विट्यात राज्य विद्यापीठीय सेवक कृती समितीचे काम बंद आंदोलन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group