• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पोलिस निरीक्षक निंभोरे साहेब, तालुक्यातील अवैध धंदे अगोदर बंद करा..!

संतोष आठवले यांचे आव्हान : शिवजयंतीला डॉल्बी बंद करून गुन्ह्यांची भीती घालू नका : अन्यथा संघर्ष अटळ

Admin by Admin
February 20, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
पोलिस निरीक्षक निंभोरे साहेब, तालुक्यातील अवैध धंदे अगोदर बंद करा..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

तासगाव : खबऱ्या प्रतिनिधी/ तासगाव तालुक्यात डॉल्बी चालून देणार नाही, असे फर्मान पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी काढले आहे. कोणी डॉल्बी लावल्यास गुन्हे दाखल करण्याची तंबी ते देत आहेत. पोलीस शिवजयंतीला आमच्या आड येऊ पाहत आहेत. मात्र पोलिसांच्यात दम असेल अगोदर तालुक्यातील अवैध धंदे बंद करून दाखवावेत. मगच आमच्या शिवजयंतीच्या आड यावे. अन्यथा संघर्ष अटळ आहे, असे आव्हान माजी पंचायत समिती सदस्य संतोष आठवले यांनी दिले.

आठवले म्हणाले, तालुक्यात वर्षभर डॉल्बीचा दणदणाट सुरूच असतो. रात्री उशिरापर्यंत मोठमोठ्या आवाजात डॉल्बी चालवले जातात. मात्र शिवजयंती, आंबेडकर जयंती अथवा कोणता राष्ट्रीय सण आला की पोलिसांना कायद्याची आठवण होते. वर्षभर चालणाऱ्या धिंगाण्याकडे पोलिसांचे लक्ष नसते. त्यावेळी मिळणाऱ्या चिरीमिरीमुळे पोलीस सगळ्या गोष्टींना मोकळीक देतात. शिवजयंती अथवा आंबेडकर जयंतीलाच पोलिसांना नियम दिसतो. जनतेच्या भावना दुखवण्याचे काम ते करतात.

तासगाव तालुक्यात गल्ली बोळात अवैध धंदे सुरू आहेत. मटका, जुगार, वाळूची चोरी यासह अनेक काळ्या धंद्यांनी डोके वर काढले आहे. तरुण पिढी या काळ्या धंद्यांच्या आहारी जात असताना पोलीस मात्र आपल्या पोटावर डाळ ओढण्याचे काम करीत आहेत. त्यांना मिळणाऱ्या मलिद्यामुळे राजरोसपणे हे धंदे सुरू आहेत. या भानगडींकडे पोलिसांचे लक्ष नाही.

मात्र शिवजयंती, आंबेडकर जयंती आली की पोलिसांमधील खाकी वर्दी जागी होते. त्यांना कायदा आठवतो. डॉल्बी लावू देणार नाही. गुन्हे दाखल करू, अशी दमबाजी त्यांच्याकडून केली जाते. अशावेळी जागे होणारे पोलीस वर्षभर झोपेत असतात का, हा खरा सवाल आहे.

आठवले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे दैवत आहेत. त्यांची जयंती ही थाटातच साजरी होणार. पोलीस जर आमच्या आड आले तर संघर्ष अटळ आहे. जयंतीला डॉल्बी लागणारच. पोलिसांनी शिवभक्तांच्या भावना दुखवू नयेत. अन्यथा हे प्रकरण वेगळ्या वळणावर जाईल. पोलिसांनी आम्हास गुन्ह्यांची भीती घालू नये. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. गुन्ह्यांना अथवा पोलिसांच्या धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही. शिवजयंती थाटातच साजरी करू.

भानुदास निंभोरे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू : संतोष आठवले

तासगावचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे हे शिवभक्तांच्या भावनेवर बोट ठेवत आहेत. शिवजयंती आली की पोलिसांना डॉल्बी बंदीची आठवण होते. वर्षभर गावागावात, गल्ली बोळातून सुरू असणाऱ्या गावदेव व वरातीच्या समोर वाजणारा डॉल्बी पोलिसांना दिसत नाही. त्यामुळे जर यावेळी निंभोरे शिवभक्तांच्या आड आले तर त्यांची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहे, असे माजी पंचायत समिती सदस्य संतोष आठवले यांनी सांगितले.

Previous Post

कुपवाड मध्ये नशेच्या गोळ्या, गांजा विक्रीचा धंदा जोमात..? व्यसनाधिनता भिनली तरुणाईच्या रोमारोमात..!!

Next Post

जेनेरिक औषधांची डॉक्टरांनाच ‘अ‍ॅलर्जी’

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जेनेरिक औषधांची डॉक्टरांनाच ‘अ‍ॅलर्जी’

जेनेरिक औषधांची डॉक्टरांनाच 'अ‍ॅलर्जी'

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group