कडेगाव:- पत्रकारांना आपल्या सग्या सोयऱ्या सारखी वागणूक देऊन त्यांच्यावर अन्याय झाल्यास स्वतःवर अन्याय झाल्या सारखं पेटून उठणारे दै तरुण भारतचे उपसंपादक शिवराज आप्पासाहेब काटकर (आण्णा) यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी फेरनिवड करण्यात आली असून या निवडीने ग्रामीण तसेच शहरी भागातील पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झालं आहे.
जिल्ह्यातील कोणत्याही पत्रकारावर संकट येऊ दे अशावेळी त्या पत्रकाराला फक्त एकच नाव आठवतं आणि ते म्हणजे शिवराज (आण्णा) काटकर. पत्रकार कुठलाही असो त्याच्यावर अन्याय झाला तर तो स्वतःवर झाला असल्या सारखं पेटून उठणारे आण्णा, जिल्ह्यातील पत्रकारांना अगदी आपलेसे वाटतात. आण्णांच्या निवडीने ग्रामीण तसेच शहरी भागातील पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आण्णांच्यावर शुभेच्छांचा अगदी वर्षाव करण्यात आला आहे.
पत्रकारांच्या किरकोळ समस्या,अडीअडचणी, आर्थिक मदती साठी आण्णा नेहमी हजर असतात. एखाद्या पत्रकारावर अन्याय झाला तर आण्णा स्वतःवर अन्याय झाल्यासारखे पेटून उठतात आणि त्या पत्रकारा पर्यंत पोहचून त्याला धीर देण्याचं काम करतात आणि त्याला न्याय ही मिळवून देतात. अशा आण्णांवर जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील पत्रकार प्रेम करतात.

