• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

नृसिंहवाडी येथे दर्शन व्यवस्थेचे नियोजन करण्याची मागणी

Admin by Admin
February 7, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
नृसिंहवाडी येथे दर्शन व्यवस्थेचे नियोजन करण्याची मागणी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नृसिंहवाडी; खबऱ्या प्रतिनिधी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. गर्दीच्या वेळी मिठाई बाजारपेठ ते मुख्य दत्त मंदिर या मार्गावर दर्शनासाठी जाताना भाविकांना आणि नागरिकांना मोठा त्रास होत आहे.

या मार्गावर अनेकवेळा धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरीचे प्रकार घडले आहेत. याचा फटका महिला, लहान मुलांना बसत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने नेटके नियोजन करून उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.

दोन दिवसांपूर्वी माघ महिन्याच्या पौर्णिमेदिवशी धक्काधक्की झाल्याचा प्रकार घडला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. शासकीय अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाने गर्दीच्या वेळी या रस्त्याची पाहणी करणे आवश्यक आहे. तसेच दत्त मंदिराकडे जाणारा रस्ता रुंद करणे, रहदारीला अडथळा येईल अशी अतिक्रमणे हटवणे, एकेरी वाहतूक प्रायोगिक तत्त्वावर सुरू करणे, दुकाने मागे घेणे, या पर्यायावर चर्चा करण्यासाठी बैठक घेणे गरजेचे आहे. तसेच नागरिक आणि दुकानदारांची मते अजमावून घेणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा प्रांतातून प्रत्येक पौर्णिमा, दत्त जयंतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. वाढत्या गर्दीच्या वेळी पोलीस बंदोबस्त अपुरा असतो, अशी तक्रार भाविकांतून होत आहे. त्यामुळे दत्त देवस्थान आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने हा प्रश्न संयुक्तपणे सोडवणे आवश्यक आहे.

Previous Post

जिल्ह्यातील “ती” ग्रामपंचायत बरखास्त करा : ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी, सीईओंना निवेदन

Next Post

बिअर शॉपीच्या बोगस परवान्याचा मुद्दा तापला! ग्रामस्थांमधून कारवाईची मागणी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बिअर शॉपीच्या बोगस परवान्याचा मुद्दा तापला! ग्रामस्थांमधून कारवाईची मागणी

बिअर शॉपीच्या बोगस परवान्याचा मुद्दा तापला! ग्रामस्थांमधून कारवाईची मागणी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group