• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली जिल्ह्यात राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल.

Admin by Admin
January 28, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक
1 min read
0
सांगली जिल्ह्यात राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

जत; खबऱ्या प्रतिनिधी : बालगाव (ता.जत) येथील बसवेश्वर चौकात प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वज उलटा फडकविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद कन्नड शाळेतील शिक्षक प्रभाकर इरगोंडा सलगर यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी राष्ट्र गौरव अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची उमदी पोलिसात फिर्याद संजयकुमार विठ्ठल माळी यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, बालगाव येथील बसवेश्वर चौकात प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज कार्यक्रम गुरुवारी सकाळी नऊ वाजता सुमारास सुरू होता. सदरच्या ठिकाणचा राष्ट्रध्वज हा वरती केसरी रंगाच्या ऐवजी हिरवा रंग अशी बांधणी शिक्षक प्रभाकर सलगर यांनी केली होती. याबाबत सलगर यांना माहिती असणं गरजेचे होते. दरम्यान, सदर राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी गावातील दुंडाप्पा शेकाप्पा कोटी (रा. बालगाव) हे पुढे गेले. त्यावेळी राष्ट्रध्वज बांधणारे जिल्हा परिषद शिक्षक प्रभाकर इरगोंडा सलगर यांनी दुंडाप्पा कोटी यांना झेंडा फडकविण्याची दोरी हातात दिली तसेच दुसरी दोरी सलगर यांनी स्वत:च्या हातात धरून उभारले. यानंतर राष्ट्रध्वज सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रध्वजाचा केसरी रंग हा वर असणे गरजेचे असताना तो खाली व हिरवा रंग वर अशा स्थितीत सदरचा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. त्यामुळे राष्ट्रध्वजाची अवहेलना झाली.

तरी सदरचा राष्ट्रध्वज बांधणारे प्रभाकर इरगोंडा सलगर (रा. बालगाव ) हे जिल्हा परिषद शिक्षक असुन त्यांना राष्ट्रध्वज फडकविण्या विषयीचे ज्ञान असताना देखील त्यांनी सदरचा राष्ट्रध्वज उलटा असतानाही तो गावातील दुंडाप्पा शेकाप्पा कोटी (रा. बालगाव) यांचे हस्ते फडकविण्यात आला. राष्ट्रध्वजाच्या अपमान झाल्याने सलगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

भाजप पुन्हा उद्धव ठाकरेंना ‘टाळी’ देण्याच्या तयारीत!

Next Post

१५ लाखांचा गांजा जप्त ; स्थानिक गुन्हे अन्वेषण व म्हसवड पोलिसांची कारवाई.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
१५ लाखांचा गांजा जप्त ; स्थानिक गुन्हे अन्वेषण व म्हसवड पोलिसांची कारवाई.

१५ लाखांचा गांजा जप्त ; स्थानिक गुन्हे अन्वेषण व म्हसवड पोलिसांची कारवाई.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group