• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खासदाराच्या तक्रारीवरून चार पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस, लोकसभा सचिवालयात हजर राहण्याचे आदेश, पोलीस महासंचालकांना सुद्धा नोटीस.

Admin by Admin
March 30, 2022
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
खासदाराच्या तक्रारीवरून चार पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस, लोकसभा सचिवालयात हजर राहण्याचे आदेश, पोलीस महासंचालकांना सुद्धा नोटीस.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खबऱ्या प्रतिनिधी : खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून अमरावती पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्त, अमरावती यांना 6 एप्रिल रोजी लोकसभा सचिवालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांच्या विरोधात हक्कभंग दाखल केल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह आणि अमरावतीचे तत्कालीन पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

प्रकरण काय आहे?

2020 मध्ये अमरावती जिल्ह्यात प्रचंड पावसामुळे शेतीचं खूप नुकसान झालं त्यामुळे शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रति एकर नुकसान भरपाई आणि वीजबिल 50 टक्के माफ करावं यासाठी आमदार रवी राणांनी शेतकऱ्यांना घेऊन 13 नोव्हेंबर 2020 ला अमरावती-नागपूर महामार्ग मोझरी येथे तब्बल दोन तास रास्तारोको आंदोलन केले. यावेळी तिवसा येथे टायरची जाळपोळ केली. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या आंदोलनामुळे आमदार रवी राणा यांच्यासह 18 शेतकऱ्यांना तिवसा पोलीसांनी अटक केली आणि न्यायालयाने 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यावेळी आमदार रवी राणानी दिवाळी न्यायालयीन कोठडीत काढली.

तक्रारींवर चार खासदारांच्या स्वाक्षऱ्या

14 नोव्हेंबर 2020 दिवाळीच्या दिवशी खासदार नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेर महिलांना घेऊन ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर 15 नोव्हेंबर 2020 रोजी हे दोघेही शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्री यांच्या मातोश्रीवर जाऊन निवेदन देणार होते पण पोलिसांनी सायंकाळी त्यांना घरूनच ताब्यात घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात आणले होते. यावेळी खासदार नवनीत राणा चांगल्याच संतापल्या होत्या आणि त्यांनी तेव्हाच सांगितले होते की, या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना संसदेत बोलावून यांच्यावर निलंबनाची कारवाई करायला लावणार. याचीच तक्रार खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष यांना 12 जानेवारी 2021 ला केली आणि त्या तक्रारींवर इतर चार खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (ज्यामध्ये भारती पवार आणि हिना गावित) यांचाही समावेश आहे आणि अखेर लोकसभा सचिवालय मधून 24 फेब्रुवारी 2022 ला उपसचिव यांनी 9 मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त, अमरावती पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग आणि तत्कालीन अमरावती पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव यांना उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे. आता 6 एप्रिल रोजी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे ज्यामध्ये आता पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना देखील हजर राहावं लागणार आहे.

Previous Post

जयसिंगपुरात दहावीचा पेपर फुटल्याने एकच खळबळ..!

Next Post

समोसा महाग झाल्याने वकिलाचा राजीनामा..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
समोसा महाग झाल्याने वकिलाचा राजीनामा..!

समोसा महाग झाल्याने वकिलाचा राजीनामा..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group