• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

थेट पोलिसांनाच आव्हान..! भर स्टेजवर शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या खिशातून ५० हजार रुपयांच्या बंडलवर मारला ‘ हात ‘…गुन्हा दाखल.

Admin by Admin
March 30, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
थेट पोलिसांनाच आव्हान..! भर स्टेजवर शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या खिशातून ५० हजार रुपयांच्या बंडलवर मारला ‘ हात ‘…गुन्हा दाखल.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी / शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून 50 हजार रुपयांच्या नोटांचं बंडल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ओबीसी मेळाव्यादरम्यान भर व्यासपीठावर ही घटना घडली. ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीमध्ये नुकताच ओबीसी मेळावा पार पडला. यावेळी वडेट्टीवार स्टेजवर उपस्थित असतानाच हा प्रकार घडला. चोरट्याने सेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्या खिशातील नोटा लांबवतानाची घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चोराचा शोध सुरु आहे.

नेमकं काय घडलं?

सांगली शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्या खिशातील 50 हजार रुपयांच्या नोटांचं बंडल चोरट्याने चोरलं. सांगलीच्या स्टेशन चौकात काँग्रेस नेते, मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ओबीसी मेळाव्या दरम्यान ही घटना घडल्याचं समोर आलं आहे.

स्टेजवर जाऊन चोरट्याने शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून नोटांचं बंडल लांबवण्याची हिंमत केली. व्यासपीठावर असलेल्या गर्दीचा फायदा घेत त्याने नोटा लांबवल्या. पैसे चोरतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

थेट पोलिसांनाच आव्हान..! भर स्टेजवर शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या खिशातून ५० हजार रुपयांच्या बंडलवर मारला ‘ हात ‘…गुन्हा दाखल.

Previous Post

Sangli Crime : वाढत्या गुन्हेगारीवर सांगली पोलिसांचा तडीपारीनं इलाज, दोन सराईत टोळ्यांतील 17 जणांवर कारवाई

Next Post

जयसिंगपुरात दहावीचा पेपर फुटल्याने एकच खळबळ..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जयसिंगपुरात दहावीचा पेपर फुटल्याने एकच खळबळ..!

जयसिंगपुरात दहावीचा पेपर फुटल्याने एकच खळबळ..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group