• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पुणे-बंगळूर महामार्ग सहा पदरीकरण सुरू

Admin by Admin
January 1, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
पुणे-बंगळूर महामार्ग सहा पदरीकरण सुरू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इस्लामपूर; खबऱ्या प्रतिनिधी : चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पुणे-बंगळूर आशियाई महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे. सन २०१८ मध्ये सहापदरीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली होती.

सध्या रुंदीकरणाच्या कामाचा प्रारंभ झाला असून अधिगृहीत जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यात येत आहेत.

१७ वर्षांपूर्वी या मार्गाचे चौपदरीकरण झाले होते. सन २०१८ साली सातारा ते कागल या १३३ कि.मी. अंतराच्या सहा पदरीकरणास मंजुरी मिळाली होती. कामाच्या निविदाही काढण्यात आल्या होत्या. शेंद्रे ते पेठनाका व पेठनाका ते कागल अशा दोन विभागांत दोन ठेकेदार नेमण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यातील कासेगाव ते कणेगाव या ३२ कि.मी. मधील पूर्वेकडील अधिगृहीत जमिनीचे सपाटीकरण सुरू झाले आहे. रस्त्यात येणारी अतिक्रमणे, झाडे-झुडपे काढण्यात येत आहेत.

हस्तांतरित जमिनीतील पिके, वहिवाट, टपऱ्या काढल्या जात आहेत. मात्र, काही ठिकाणी शेतकरी संबंधित अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत आहेत. काही शेतकरी अतिक्रमणे काढण्यासही तयार नाहीत. १७ वर्षांपूर्वी चौपदरीकरण झाले त्याचवेळी वाढीव जमिनीचे हस्तांतरण करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला आहे. मात्र १७ वर्षांपासून काही ठिकाणी सेवा रस्त्यांची कामे अपुरीच राहिली होती. अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी वहिवाट सुरू ठेवल्या आहेत. रुंदीकरणाचे काम सुरू झाल्याने अनेक भागात शेतकऱ्यांना शेतातील ऊस रस्त्यावर आणण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

पुन्हा वृक्षतोड

पुणे-बंगळूर आशियाई महामार्गाच्या चौपदरीकरणा वेळी रस्त्याकडेला असणारी १०० ते १५० वर्षाची जुनी वडाची व पिंपळाची झाडे तोडण्यात आली होती. त्यानंतर रस्त्याकडेला काही प्रमाणात नवी झाडे लावण्यात आली होती. आता सहा पदरीकरणावेळी या वाढलेल्या झाडांचीही अनेक ठिकाणी तोड होणार आहे.

Previous Post

२ जानेवारीपासून पोलीस भरती प्रक्रिया ,शहरात ४१ तर ग्रामीणमध्ये १९७ पदे..

Next Post

भाजपने उडवली ठाकरे गटाची खिल्ली..! व्यंगचित्रात शरद पवार ज्योतिषी दाखवत उद्धव ठाकरेंकडून वदवला “हा” प्रश्न..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
भाजपने उडवली ठाकरे गटाची खिल्ली..! व्यंगचित्रात शरद पवार ज्योतिषी दाखवत उद्धव ठाकरेंकडून वदवला “हा” प्रश्न..!

भाजपने उडवली ठाकरे गटाची खिल्ली..! व्यंगचित्रात शरद पवार ज्योतिषी दाखवत उद्धव ठाकरेंकडून वदवला "हा" प्रश्न..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group