• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तासगाव तालुक्यातील गौण – खनिज उत्खननाची चौकशी करा

पत्रकार संघाची तहसीलदारांकडे मागणी : पत्रकार दिलीप जाधव यांच्याविरोधातील खोट्या तक्रारीविरुद्ध उद्या तहसीलसमोर धरणे आंदोलन

Admin by Admin
December 29, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
तासगाव तालुक्यातील गौण – खनिज उत्खननाची चौकशी करा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तासगाव : खबऱ्या प्रतिनिधी : तासगाव तालुक्यात गौण – खनिज तस्करांनी नंगा नाच सुरू केला आहे. वाळू, मुरूम माफियांनी महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाची लूट सुरू केली आहे. स्टोन क्रशर चालकांनी तर उभ्या डोंगराला सुरुंग लावून निसर्गावरच बलात्कार करण्यास सुरुवात केली आहे. या गौण खनिज उत्खननाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी तासगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार रवींद्र रांजणे यांना दिले आहे.

तर दैनिक पुढारीचे पत्रकार दिलीप जाधव यांच्याविरोधात खोटी तक्रार देणाऱ्या गौण खनिज तस्करांविरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी पत्रकार संघाच्या वतीने उद्या तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

तासगाव तालुक्यात गौण खनिजाची तस्करी करणाऱ्यांचे वाभाडे काढणारी लेखमाला दैनिक पुढारीने सुरू केली आहे. ही लेखमाला सुरू होताच तस्करांचे धाबे दणाणले आहेत. आपल्या बुडाखालील बचबच लपवण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे. तर या तस्करांकडून हप्ते मिळवून आपले खिसे भरणाऱ्या महसुलाच्या अधिकाऱ्यांचीही चांगलीच फाटली आहे. तालुक्यातील गौण खनिजाची तस्करी करणाऱ्यांची सखोल चौकशी झाल्यास काळेबेरे बाहेर येणार आहे.

दरम्यान, ही लेखमाला सुरू करणाऱ्या पत्रकार दिलीप जाधव यांच्याविरोधात तस्करांनी खोटी तक्रार दिली आहे. या तक्रातीबाबत कोणतीही सत्यता पडताळून न पाहता कर्तबगार पोलिसांनीही जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. खोटा गुन्हा दाखल करून पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. याविरोधात तासगाव तालुक्यातील पत्रकार आक्रमक झाले आहेत. खोटी तक्रार दाखल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल व्हावा. तालुक्यातील गौण खनिज उत्खननाची चौकशी करावी, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे. या मागणीसाठी उद्या शुक्रवार तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

मुळात वाळू, मुरूम तस्कर तसेच उभ्या डोंगराला नागवून निसर्गाची ‘वाट’ लावणारे स्टोन क्रशर चालक हे काय साधू संत नाहीत. ही मंडळी फार अब्रुवान आहेत असे नाही. आपले काळे धंदे चालवण्यासाठी अधिकाऱ्यांची थुंकी झेलणारे तसेच त्यांचे खिसे गरम करणारी ही मंडळी कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी बुडवून महसूल विभागाला चुना लावत आहेत.

स्टोन क्रशर चालकांची कशीही आणि कधीही चौकशी केल्यास त्यांचे काळेबेरे चव्हाट्यावर येणार आहे. महसुलचे अधिकारी मात्र दर महिन्याला मिळणाऱ्या बिदागिमुळे चिडीचूप आहेत. गौण खनिज तस्करांकडून हप्ते गोळा करण्यासाठी काही राजकीय पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही बाब गंभीर आहे. गौण – खनिज तस्कर व त्यांना पाठिंबा देणारे हप्तेखोर अधिकारी हे स्वतः काचेच्या घरात राहतात. पत्रकारांनी या मंडळींच्या बारीकसारीक गोष्टीत लक्ष घातल्यास एकाचेही क्रशर सुरू राहणार नाही. मात्र तरीही ही मंडळी पत्रकारांवर तक्रार करण्याचे धाडस दाखवत आहेत.

तस्करांनी असे हजार गुन्हे दाखल केले तरी फरक पडत नाही. गुन्हे दाखल करून स्वतःच्या बुडाखालील घाण लपवता येणार नाही. शिवाय पत्रकारांचा आवाजही दाबता येणार नाही. मात्र म्हातारी मेलेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये. त्यामुळे बदनामी केल्याची खोटी तक्रार देणाऱ्या पिलावळींची प्रवृत्ती ठेचलीच पाहिजे. अन्यथा लायकी नसणारी बांडगुळे पत्रकारविरोधात गरळ ओकण्यास मागेपुढे बघणार नाहीत.

Previous Post

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त..!

Next Post

अंबडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची चौकशी..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अंबडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची चौकशी..

अंबडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची चौकशी..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group