• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पुण्यात आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह ; प्रशासन हाय अलर्टवर

Admin by Admin
December 28, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
पुण्यात आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह ; प्रशासन हाय अलर्टवर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Corona Virus : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने चीनने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतातही प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि खबरदारीचे उपाय सुरु करण्याचे आदेश केंद्र सरकारने कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.असे असतानाच आता पुणेकरांच्या चिंतेतही भर पडली आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. विमानतळावर या व्यक्तीची कोरोना चाचणी केली असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. पुण्यात सध्या कोरोनाचे ५४ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत

राज्यात पुणे आणि मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या आहे. मुंबईमध्ये ४९ रुग्ण सक्रिय तर पुण्यात ५४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून खबरदारी घेण्यासाठी सातत्याने आव्हान केले जात आहे.

चीनमध्ये कोरोनाची भयावह परिस्थिती असून आता अमेरिकेमध्येही कोरोनाने हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. चीनमुळे जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रमुख मंदिर प्रशासानांनी मास्क सक्तीचा निर्णय घेतला आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थान प्रशासनाकडून दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

यासोबतच कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात कर्मचाऱ्यांसाठीही मास्कसक्ती करण्यात आली आहे. तसेच, पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरातही दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना मास्कसक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील मुंबा देवी मंदिरातही कर्मचारी आणि भाविकांना मास्क वापरण्याचा सूचना देण्यात आला आहे.

Previous Post

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर 16 महिला पोलिसांचे विशेष पथक तैनात.

Next Post

Miraj | पॅसेंजरमध्ये मुलीचा विनयभंग ; रेल्वे तिकीट तपासणीस विरुद्ध गुन्हा दाखल.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Miraj | पॅसेंजरमध्ये मुलीचा विनयभंग ; रेल्वे तिकीट तपासणीस विरुद्ध गुन्हा दाखल.

Miraj | पॅसेंजरमध्ये मुलीचा विनयभंग ; रेल्वे तिकीट तपासणीस विरुद्ध गुन्हा दाखल.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group