ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृती संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी दिली. याडगीकर यांनी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची दिलासादायक माहिती दिली आहे. ‘त्यांच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे. ते डोळे ही उघडत आहेत. पुढच्या ४८ तासांत व्हेंटिलेटरची पण गरज भासणार नाही. तसंच बीपी आणि हृदयाची क्रिया सुरळीत सुरू आहे. ‘ असं मेडिकल बुलेटिनमध्ये दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी याडगीकर यांनी सांगितलं आहे.

