कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यासह सोलापूर आणि अक्कलकोट येथील गावांवर आपला दावा सांगितला आहे. त्यांनतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी एकही इंच जागा आम्ही कर्नाटकाला देणार नाही अशा शब्दात बोम्मई यांना ठणकावलं आहे. ते कराड येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

