• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

हद्दपार गुन्हेगाराने केले कोयत्याने वार ; विट्यातील धक्कादायक प्रकार..

Admin by Admin
November 14, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
हद्दपार गुन्हेगाराने केले कोयत्याने वार ; विट्यातील धक्कादायक प्रकार..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विटा : खबऱ्या प्रतिनिधी /विट्यात कापड दुकानात काम करणाऱ्या कामगारावर एकाने कोयत्याने हल्ला करून त्‍याला जखमी केले. आकाश संजय माळी (वय २४, रा. बापट रुग्णालयाच्यामागे, विटा) असे जखमीचे नाव असून, त्याच्यावर रोहित युवराज भिंगारदेवे (रा.फुलेनगर, विटा) याने हा हल्ला केला. विशेष म्हणजे हल्लेखोर रोहित भिंगार देवे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यास १३ नोव्हेंबर रोजी तीन महिन्यांसाठी तीन जिल्ह्यातून विटा पोलिसांनी हद्दपार केले होते. या घटनेमुळे विटा पोलीसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याबद्दल मिळालेली माहिती अशी की, विटा येथील एका कापड दुकानात आकाश माळी हा काम करतो. काल (रविवार) सकाळी ११ वाजता आकाश दुकानात असताना रोहित भिंगार देवे हा हातात कोयता घेऊन दुकानदारावर दहशत निर्माण करीत होता. त्यावेळी माळी आणि रोहित यांच्यात किरकोळ वाद झाला. या भांडणाचा राग मनात धरून रोहितने सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास पुन्हा कापड दुकानासमोर येऊन तेथे उभ्‍या असलेल्या आकाशला शिवीगाळ करून कोयत्याच्या पाठीमागील बाजूने त्याच्यावर हल्ला केला. त्यावेळी आकाशच्या डाव्या हाताला मार लागल्याने तो जखमी झाला आहे.

हल्लेखोर रोहितच्यावर जबरी चोरी, मारामारी, घरफोडी आदी गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याला या प्रकरणांमुळे अटकही झाली होती. शिवाय जामिनावर सुटून आल्यानंतरही तो गुन्हे आणि सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहोचेल असे कृत्य करीत होता. त्यामुळे विट्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी त्याला १३ नोव्हेंबर रोजी सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे. तरीही त्याने आता विटा शहरात येऊन दहशत माजवून तरुणावर हल्ला केला. त्यामुळे विटा शहर आणि परिसरामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर रात्री उशिरा रोहित भिंगारदेवे याच्यावर विटा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आला.

Previous Post

मिरज वाहतूक शाखेचे काम कौतुकास्पद ; वाहतूक नियमांच्या बाबतीत कठोर निर्णय..!

Next Post

…तर मुंबईतील वाढत्या गोवरच्या साथीबाबतचा अहवाल थेट दिल्लीत.?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
…तर मुंबईतील वाढत्या गोवरच्या साथीबाबतचा अहवाल थेट दिल्लीत.?

…तर मुंबईतील वाढत्या गोवरच्या साथीबाबतचा अहवाल थेट दिल्लीत.?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group