• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तुम्ही शिवसेनेचे प्रमुख आहात का ?, मला असली नोटीस देताच कशी; किरीट सोमय्या पोलिसांवर संतापले

Admin by Admin
March 26, 2022
in मंत्रालय, माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय
1 min read
0
तुम्ही शिवसेनेचे प्रमुख आहात का ?, मला असली नोटीस देताच कशी; किरीट सोमय्या पोलिसांवर संतापले
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

रत्नागिरी: शिवसेनेचे मंत्री यांच्या दापोलीतील रिसॉर्टच्या दिशेने निघालेल्या भा.ज.पा. नेते यांचा ताफा कशेडी घाटात अडवण्यात आला होता.
यावेळी पोलिसांनी जमावबंदीचे कारण देत किरीट सोमय्या यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळ किरीट सोमय्या यांनी नोटीस बजावणाऱ्या पोलिसांना सर्वांदेखत चांगलेच सुनावले.

पोलिसांनी दिलेल्या नोटीसमध्ये अनिल परब यांच्याशी संबंधित साई रिसॉर्टचा उल्लेख होता. हे रिसॉर्ट तुटल्यास स्थानिकांच्या रोजरोटीचा प्रश्न निर्माण होईल, असेही नोटीसमध्ये नमूद केल्याचे सोमय्यांचे म्हणणे होते. मात्र, तुम्ही नोटीसमध्ये असा उल्लेख करूच कसा शकता? हा मुद्दा तुमच्या अखत्यारित येतो का?
तुम्ही शिवसेनेचे प्रमुख आहात का ?,  अशा प्रश्नांची सरबत्ती करत किरीट सोमय्या यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

अनिल परब यांचे दापोलीतील अनधिकृत रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या सकाळी मुंबईतून दापोलीच्या दिशेने रवाना झाले होते.  दुपारी तीनच्या सुमारास त्यांचा ताफा रत्नागिरीत येथील कशेडी घाटात पोहोचला.  तेव्हा पोलिसांनी किरीट सोमय्या यांची गाडी अडवली. पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी किरीट सोमय्या यांना जमावबंदीचे कारण पुढे करत पुढे जाण्यास प्रवेश नाकारला. मात्र, किरीट सोमय्या यांनी ही नोटीस बेकायदेशीर असल्याचे म्हटले.

तुम्ही यापूर्वी कोणत्या लोकांना अडवलेत का?
मग माझीच गाडी का अडवली जात आहे?,  असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला.  तसेच साई रिसॉर्टवर सी.आर.झेड. कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई होत आहे.  राज्यपाल आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत.
मग तुम्ही स्थानिकांच्या रोजीरोटीचे कारण पुढे करून मला अडवूच कसे शकता?  तुम्ही मला धमकी देताय का? मी या नोटीसवर स्वाक्षरी करणार नाही, असे सांगत किरीट सोमय्या पुन्हा दापोलीच्या दिशेने मार्गस्थ झाले. आता किरीट सोमय्या दापोलीत गेल्यानंतर काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पोलिसांकडून किरीट सोमय्या यांना दापोलीच्या चौकातच अडवले जाण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भा.ज.पा. आमने सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दापोलीत दंगल नियंत्रण पथकासह मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Previous Post

” काहीही घडलं तर तुम्ही जबाबदार राहणार..” , खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी केला किरीट सोमय्यांना नोटीस देण्याचा प्रयत्न .

Next Post

” मी विहिरीत जीव देईन, पण मी पार्टी बदलणार नाही. “- नितीन गडकरीं असं का म्हणाले,

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
” मी विहिरीत जीव देईन, पण मी पार्टी बदलणार नाही. “- नितीन गडकरीं असं का म्हणाले,

" मी विहिरीत जीव देईन, पण मी पार्टी बदलणार नाही. "- नितीन गडकरीं असं का म्हणाले,

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group