• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कडेगावच्या दत्त मंदिराच्या दान पेटीतून दहा हजारांची चोरी

Admin by Admin
September 20, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कडेगावच्या दत्त मंदिराच्या दान पेटीतून दहा हजारांची चोरी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कडेगाव, खबऱ्या प्रतिनिधी : येथील दत्त मंदीरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी एकूण 10 हजार रुपये लंपास केल्याची घटना घटना शनिवारी (दि.17) रात्री घडली.

याबाबत विश्वास हणमंतराव व्यास (रा.कडेगाव) यांनी कडेगाव पोलीसात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कडेगावात कोतमाई ओढ्यानजीक दत्त मंदिर आहे. शनिवारी (दि.17)रात्री अज्ञात चोरट्यांनी दत्त मंदिराच्या दरवाजाचे कुलूप कटावणीने तोडले व मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केला.

त्यानंतर दान पेटी ही मंदीराच्या गाभाऱ्यात आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु ते कुलूप तुटले नाही. त्यामुळे चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला व येथील दानपेटी फोडली. या दानपेटीत भाविकांनी दान केलेले नोटा व नाणी अशी एकुण 10 हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. हा प्रकार दर्शनासाठी आलेल्या भक्तांना समजताच त्यांनी कडेगांव पोलीस ठाण्याशी संपर्क केला. पोलिसांना चोरीची माहिती दिली. या घटनेची कडेगाव पोलीसात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे व सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी हे करीत आहेत.

Previous Post

कासेगाव | एसटी प्रवाशांना लुटणार्‍या महिलांची टोळी जेरबंद

Next Post

शिंदेंचे नाव ,भाजपचा डाव..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शिंदेंचे नाव ,भाजपचा डाव..!

शिंदेंचे नाव ,भाजपचा डाव..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group