Friday, June 6, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शैक्षणिक शुल्कास सक्ती केल्यास कारवाई : शिक्षणाधिकारी गायकवाड

Admin by Admin
June 12, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक
0
शैक्षणिक शुल्कास सक्ती केल्यास कारवाई : शिक्षणाधिकारी गायकवाड

 

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी; खासगी अनुदानित, अंशता अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना विद्यार्थी व पालकांकडून शाळा प्रवेश किंवा इतर शुल्क घेणेसाठी सक्ती करू नये.

शैक्षणिक शुल्कासंदर्भात तक्रार आल्यास संबंधित शाळेवर कारवाई करून मान्यता रद्दचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल, असा इशारा जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिला
आहे.

गायकवाड म्हणाले, खासगी अनुदानित, अंशत:अनुदानित शाळात बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना कोणत्याही स्वरुपात देणगी किंवा शासनाने विहित न केलेले कोणतेही शुल्क आकारता येणार नाही. प्रवेशासाठी देणगी किंवा शुल्क घेतल्यास देणगी शुल्क रकमेच्या 10 पट दंड वसुलीस शाळा पात्र राहिल. शैक्षणिक संस्थांकडून भरमसाठ शुल्क आकाराण्याची प्रथा राज्यात वाढत चालली आहे.

या प्रथेला आळा घालण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा उंचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पालकाकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क वसुलीबाबत सक्ती करू नये व त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवू नये पालकांना आर्थिक भुर्दंड होणार नाही. या बाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी उद्भवू नये याची खबरदारी घ्यावी.

प्रत्येक शाळात पालक-शिक्षक संघ गठित करा

श्री. गायकवाड म्हणाले, जादा शुल्क गोळा करण्यास प्रतिबंध करणे व शुल्क निश्चित करणेसाठी प्रत्येक खासगी शाळा, पालक – शिक्षक संघ गठित करेल. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला तीस दिवसांच्या आत शाळा प्रमुखाद्वारे हा संघ स्थापना करण्यात येईल. समितीने शुल्क निश्चिती केल्यानंतर शुल्काचा तपशील सूचना फलकावर आणि शाळेचे संकेतस्थळ असल्यास, शाळेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करावे.

Previous Post

सांगली -मिरजेच्या कार्यालयातुन “त्या” कर सल्लागाराची ई.डी.कडून आक्षेपार्ह कागदपत्रे, माहिती ताब्यात

Next Post

“राजकारणातील चाणक्य तोंडघशी पडले..? काहीतरी वेगळंच घडले..!”

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“राजकारणातील चाणक्य तोंडघशी पडले..? काहीतरी वेगळंच घडले..!”

"राजकारणातील चाणक्य तोंडघशी पडले..? काहीतरी वेगळंच घडले..!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014