• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

माजी नगरसेवकाची शिफारस; सभागृह नेते संतापले; शाखा अभियंत्याची स्वाक्षरी बोगस : नगरसेवक आक्रमक; महापौरही भडकले..

Admin by Admin
June 8, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
माजी नगरसेवकाची शिफारस; सभागृह नेते संतापले; शाखा अभियंत्याची स्वाक्षरी बोगस : नगरसेवक आक्रमक; महापौरही भडकले..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज ; खबऱ्या प्रतिनिधी : नगरसेवक निधीतील अनेक कामे तीन-चार वर्षांपासून रखडल्यावरून मंगळवारी महापालिकेतील बैठकीत खडाजंगी झाली. प्रलंबित कामांवरून नगरसेवक आक्रमक झाले.

महापौरही प्रशासनावर भडकले. कामांच्या फाईल प्रलंबित राहण्यास जबाबदार असणारे कर्मचारी, अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्चित करा, कार्यादेश मिळूनही काम सुरू न करणार्‍या, काम पूर्ण न करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, असे निर्देश महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिले.

महापालिकेच्या वसंतदादा सभागृहात बैठक झाली. अध्यक्षस्थानी महापौर दिग्विजय सूर्यवंशी होते. उपमहापौर उमेश पाटील, सभागृह नेते विनायक सिंहासने, स्थायी सभापती निरंजन आवटी, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, अतिरिक्त आयुक्त संजीव ओहोळ, उपायुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता संजय देसाई, नगरसचिव चंद्रकांत आडके तसेच नगरसेवक उपस्थित होते.

सन 2018-19 पासून नगरसेवक निधीतील मंजूर अनेक कामे रखडली आहेत. काही कामे निविदा प्रक्रियेत अडकली आहेत. काही कामांचे कार्यारंभ आदेश रखडले. कार्यारंभ आदेश होऊनही काही कामे सुरूच झाली नाहीत. गेल्या चार वर्षांपासून अनेक कामे रखडली असल्यावरून नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. सर्वच नगरसेवक आक्रमक झाले होते.

फाईल गायब, दप्तर दिरंगाई

आढावा बैठक असतानाही प्रभागनिहाय, कामनिहाय माहिती बांधकाम विभागााकडे नसल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. कामांच्या फाईल कोणत्या विभागात, कोणत्या टप्प्यावर प्रलंबित आहे, हेही व्यवस्थितपणे सांगता येत नसल्यावरून नगरसेवक आक्रमक झाले. बांधकाम, ऑडिट, लेखा विभागात फाईलचा वेळेत निपटारा होत नसल्याच्या तक्रारीही नगरसेवकांनी केल्या. फाईल गायब होत असल्यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.

8.44 कोटींची कामे ‘समाजकल्याण’च्या परस्पर

समाजकल्याण समितीच्या परस्पर 8.44 कोटींच्या कामांच्या मंजुरीवरून सभापती सुब्राव मद्रासी, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, योगेंद्र थोरात, आनंदा देवमाने यांनी प्रशासनाला धारेवर धरले. बराच वाद आणि गोंधळ घातला. दरम्यान याप्रकरणी प्रशासनाने खुलासा सादर करावा, असे निर्देश महापौर सूर्यवंशी यांनी दिले. सूर्यवंशी म्हणाले, अनेक कामे प्रलंबित आहेत. ठेकेदार ‘बिलो’मध्ये जाऊन कामे घेतात, पण पूर्ण करत नाहीत. कार्यादेश देऊन काम सुरू करत नाहीत, त्यांना ‘ब्लॅक लिस्ट‘ करण्याचे आदेश दिले आहेत. काही ठेकेदार दहा-वीस-पंचवीस कामे घेतात. पण कामे करत नाहीत. जुनी कामे रखडली असतील तर नवीन कामांच्या निविदा प्रक्रियेत सहभाग घेता येणार नाही, अशाप्रकारे निविदेत अट समाविष्ट करण्याचे निर्देश दिले. नगरसेवकांनी सूचवलेल्या कामांच्या फाईल मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत.

 मिरज येथील प्रभाग समिती क्रमांक 4 कडील रस्ता मुरुमीकरण, खडीकरणाचे काम एका माजी नगरसेवकांच्या शिफारशीने आले आहे. विद्यमान नगरसेवकांचे पाच लाखांचे काम मंजूर होत नसताना माजी नगरसेवकांचे 15 लाखांचे काम मंजुरीला कसे आले, असा प्रश्न सभागृह नेते विनायक सिंहासने यांनी उपस्थित केला. या प्रस्तावातील टिपणीत शाखा अभियंत्यांची स्वाक्षरी बोगस असल्याचा प्रकारही समोर आला. याप्रकरणी चौकशी व कारवाईचे आदेश देण्यात आले.

शहर अभियंत्यांवर महापौर वैतागले

रखडलेल्या कामांवरून महापौर दिग्विजय सूर्यवंशी निर्देश देत असताना शहर अभियंते संजय देसाई मत व्यक्त करत होते. त्यावरून देसाई यांच्यावर सूर्यवंशी वैतागले. बैठक सोडून निघून जाऊ लागले. अन्य पदाधिकार्‍यांनी त्यांना रोखले व बैठक पुढे सुरू झाली.

Previous Post

हत्यासत्र सुरूच: नाशिकच्या अंबड एमआयडीसीमध्ये कंपनीच्या अधिकाऱ्याचा खून…

Next Post

बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करा ,गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचे जिल्हा पोलिसांना निर्देश…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करा ,गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचे जिल्हा पोलिसांना निर्देश…

बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करा ,गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचे जिल्हा पोलिसांना निर्देश...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group