Saturday, June 7, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

धक्कादायक | जत तालुक्यात प्रेमीयुगलाची आपापल्या घरी विष घेऊन आत्महत्या..

Admin by Admin
June 7, 2022
in क्राईम
0
धक्कादायक | जत तालुक्यात प्रेमीयुगलाची आपापल्या घरी विष घेऊन आत्महत्या..

Sangli | जत तालुक्यातील एकुंडी येथे एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घडली आहे.नवविवाहित तरुणी व तरुण प्रेमवीराने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.आप-आपल्या घरात दोघांनी विष पिऊन आपले जीवन संपवले आहे.या घटनेमुळे जत तालुक्यातील एकच खळबळ माजली आहे.

विरहातून प्रेमीयुगलाची आत्महत्या – एकुंडी येथील लक्ष्मण संभाजी शिंदे, वय 22 आणि नवविवाहिता अश्विनी जगन्नाथ माळी वय 21,अशी या प्रेमींची नावे आहेत. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. सहा दिवसांपूर्वी म्हणजे 1 जून रोजी अश्विनीचा विवाह मिरज तालुक्यातील सलगरे येथील तरुणाशी झाला होता. त्यामुळे दोघांच्यामध्ये विरह निर्माण झाला होता. आश्विनी ही रविवारी आपल्या माहेरी एकुंडी येथे आली होती. सोमवारी सकाळच्या सुमारास आश्विनीने आपल्या घरात तर लक्ष्मण याने आपल्या घरात विष घेतले.

फोन करुन घेतला निर्णय – काही वेळात दोघांना त्रास होऊ लागला. त्यानंतर दोघांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी जत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचारापूर्वी आश्विनी आणि लक्ष्मण यांचा मृत्यू झाला. प्रेम विरहातून त्यांनी एकमेकांना फोन केला. फोनवरूनच निर्णय घेत आपले जीवन संपवल्याची चर्चा गावात सुरू आहे. गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद जत पोलिसात झाली असून, तपास पोलिस करीत आहेत.

Previous Post

सांगलीत प्रज्वलित झाली अखंड शिवज्योत

Next Post

बारावीचा निकाल याच आठवड्यात जाहीर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!

बारावीचा निकाल याच आठवड्यात जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014