• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली हादरली..! खून करून आरोपी फरार, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू ; वाढत्या गुन्हेगारीने जिल्ह्यातील नागरिकात भीती.

Admin by Admin
May 29, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली हादरली..! खून करून आरोपी फरार, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू ; वाढत्या गुन्हेगारीने जिल्ह्यातील नागरिकात भीती.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी ; अंडा बुर्जी करण्याच्या वादातून एका हातगाडी चालकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सांगलीत उघडकीस आली आहे.

संतोष तुकाराम पवार (28 रा. मोती चौक सांगली) असे हत्या करण्यात आलेल्या हातगाडी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्या संतोषला शेजाऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र पोलिसांनी त्याला मृत घोषित केले. आरोपींनी संतोषला मारहाण करत हातगाडीची तोडफोड केली आहे. त्यानंतर ते घटनास्थळावरुन फरार झाले.

गाडीच्या तोडफोडीस विरोध केल्याने तरुणावर हल्ला

शंभर फुटी रोडवरील चेतना पेट्रोल पंप नजीक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या समोरच्या बाजूला माऊली एग्ज जंक्शन नावाचा बुर्जीचा स्टॉल आहे. या स्टॉलवर दोन युवक आले होते. या युवकांचा बुर्जी स्टॉलचा मालक संतोष पवार याच्याशी वाद झाला. याच वादातून या दोघांनी बुर्जीच्या गाडीची तोडफोड करण्यास सुरुवात केली. संतोषने याला विरोध केला असता आरोपींपैकी एकाने चाकू काढला आणि संतोषच्या पोटात खुपसला. चाकूने वार केल्यानंतर संतोष जमिनीवर कोसळला. संतोषला खाली पडलेला पाहून आरोपींनी तेथून पळ काढला. शेजाऱ्यांनी तात्काळ जखमी संतोषला वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात नेले मात्र तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपींचा शोध सुरु

याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांना हत्येची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरिक्षक के. एस. पुजारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून उपस्थितांना सूचना दिल्या. दरम्यान ही हत्या किरकोळ कारणातून झाली की पूर्ववैमनस्यातून याबाबत विश्रामबाग पोलीस तपास करत आहेत. सध्या आरोपींच्या शोधाकरीता पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करीत आहेत. लवकर आरोपींना अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

Previous Post

महाविकास आघाडीला काँग्रेसकडून “टाटा टाटा -बाय बाय”..? दाखवणार ‘हात’; उद्या दिल्लीत फैसला..!

Next Post

शिराळा : सशांची शिकार करणारे पाच अटकेत

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शिराळा : सशांची शिकार करणारे पाच अटकेत

शिराळा : सशांची शिकार करणारे पाच अटकेत

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group