• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खळबळजनक | रत्नागिरीतील पोलीस भरतीत डमी उमेदवाराचा घोटाळा.

Admin by Admin
May 23, 2022
in क्राईम
1 min read
0
खळबळजनक | रत्नागिरीतील पोलीस भरतीत डमी उमेदवाराचा घोटाळा.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

रत्नागिरी | प्रतिनिधी

पोलिस भरतीतील लेखी परिक्षेत डमी उमेदवार बसवून परिक्षा पास होउन रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात नवप्रविष्ट चालक म्हणून नोकरी करत शासनाची फसवणूक करणार्‍या पोलिस कर्मचार्‍याला आणि त्याच्या सहकार्‍याला शहर पोलिसांनी अटक केली.या सर्व गुन्ह्यातील तिसरा संशयित हा परिक्षेला बसणारा डमी उमेदवार असून तो अजून फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.दरम्यान अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांना न्यायालयाने सोमवारी 27 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

गजानन दत्ता चकोते (29, रा.माळकोल्हारी,ता किनवट. जि. नांदेड) आणि पदमसिंग पुनमसिंग बमावत (राजपूत) (25, रा.टाकळेवाड ता. गंगापूर जि. औरंगाबाद) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती ज्ञानदेव जगताप यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार,पोलिस भरती 2019च्या चालक पोलिस शिपाई पदासाठी गजानन चकोते याने 13 ऑक्टोबर 2021 रोजी होणार्‍या लेखी परिक्षेला स्वतःच्या जागी डमी उमेदवार बसवला होता.त्यासाठी त्याने पदमसिंग बमावत याच्याशी सुमारे 7 लाख 50 हजार रुपयांचा आर्थिक व्यवहार केला.त्यानंतर या दोघांनी या गुन्ह्यातील तिसर्‍या संशयिताला डमी उमेदवार म्हणून लेखी परिक्षेला बसवले.डमी उमेदवाराने परिक्षेवळी हजेरीपट व उत्तर पत्रिकेवर मुळ आवेदक गजानन चकोतेसारखीच सही केली.परिक्षा पास झाल्यावर चकोतेने रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात नोकरी मिळवून या तिघांनी एकमेकांच्या संगमताने शासनाची फसवणूक केली.

दरम्यान,गजानन चकोते रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर नवप्रविष्ठ चालक पोलिस शिपाई या पदावर भरती झालेला होता.तो रत्नागिरी पोलिस मुख्यालय येथे मुलभूत प्रशिक्षण घेत असताना त्याचे वागणे संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले.त्याची चौकशी केल्यावर त्याने आपण एकाशी साडेसात लाख रुपयांचा व्यवहार करुन त्या व्दारे डमी उमेदवारास परिक्षेला बसवून भरती झाल्याचे कबूल केले.शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून या प्रकरणात चकोतेला मदत करणार्‍या पदमसिंग बमावतला औरंगाबादहून अटक केली.तो सर्‍हाईत गुन्हेगार असून त्याच्यावर पिंपरी चिंचवड,हिंजवडी,नागपूर व पालघर याठिकाणी अशाच प्रकारचे शासनाची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

Previous Post

अपक्ष म्हणून लढण्याच्या भूमिकेवर ठाम..? शिवसेनेचा प्रस्ताव धुडकावला.?

Next Post

संभोग करताना मृत्यू, हॉटेल मधील घटनेने खळबळ…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!

संभोग करताना मृत्यू, हॉटेल मधील घटनेने खळबळ...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group