• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | बहुचर्चित ते दोघंजण अखेर निलंबित….

Admin by Admin
May 18, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक
1 min read
0
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली; खबऱ्या प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे व अधीक्षक विजयकुमार अशोक सोनवणे यांना निलंबित करण्यात आले आहे.

विभागीय शिक्षण आयुक्त सूरज मांडरे यांनी ही कारवाई केली आहे. या दोघांना तीन शिक्षकांकडून 1 लाख 70 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यांच्याबाबत झालेल्या कारवाईचा अहवाल आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

येथील परिसरातील तीन शिक्षकांनी वेतनश्रेणी मिळविण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी कांबळे यांच्याकडे सादर केला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी कांबळे व सोनवणे यांनी प्रत्येकी 60 हजार रुपयांप्रमाणे 1 लाख 70 हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे दिले तरच प्रस्ताव मंजूर केले जातील, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे शिक्षकांनी 26 एप्रिलरोजी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती.

या विभागाच्या पथकाने तेव्हापासून ते 2 मेपर्यंत चौकशी केली. त्यावेळी कांबळे व सोनवणे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. एक लाख 70 हजार रुपये लाच घेताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर त्यांच्या घरावर छापे टाकून झडती घेतली. कांबळेच्या घरातून दहा लाख रुपयांची रोकड व महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. सोनवणेच्या घरात तीन लाखांची रोकड सापडली.

लाच घेतल्याचा प्रस्ताव लाचलुचपत प्रतिबंधकडून तातडीने जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार पुढील कारवाईचा जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्तांच्याकडे पाठवला होता. तो विभागीय शिक्षण आयुक्तांकडे गेल्यानंतर दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे.

Previous Post

सांगलीत महिलेवर खुनीहल्ला…

Next Post

सांगली-कोल्हापूर महामार्गाची दुरुस्ती सुरू

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली-कोल्हापूर महामार्गाची दुरुस्ती सुरू

सांगली-कोल्हापूर महामार्गाची दुरुस्ती सुरू

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group