• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | चोरट्यांचा धुमाकूळ; तीन फ्लॅट फोडले …

Admin by Admin
May 18, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली | चोरट्यांचा धुमाकूळ; तीन फ्लॅट फोडले …
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली; खबऱ्या प्रतिनिधी ; येथील विजयनगरमध्ये शिवदत्तसृष्टी अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी मंगळवारी भरदिवसा तीन फ्लॅट फोडले. सोन्या-चांदीचे दागिने व 32 हजारांची रोकड, असा एकूण 75 हजारांचा ऐवज लंपास केला.

सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. रात्री उशिरापर्यंत संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अभिषेक माने हे सकाळी कुटुंबासह बाहेर गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचा कडी व कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. बेडरुममधील कपाट उघडून त्यामधील साहित्य विस्कटले. लॉकरमधील एक तोळे तीन ग्रॅमचे सोन्याचे दागिने, चांदीची जोडवी असा ऐवज लंपास केला.

माने यांच्या शेजारीच माणिक पांढरे राहतात. तेही कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्यांनी त्यांचाही फ्लॅट फोडला. कपाटातील 32 हजारांची रोकड लंपास केली. पांढरे यांच्या शेजारील आणखी फ्लॅट चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. माने व पांढरे हे सायंकाळी अपार्टमेंटमध्ये आले. त्यावेळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.

संजयनगर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर, हवालदार दिनेश माने यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथक पाचारण केले होते. मात्र श्वान अपार्टमेंट परिसरातच घुटमळले. रात्री उशिरा माने व पांढरे यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिस ठाण्यातून सांगण्यात
आले.

Previous Post

सांगलीत रात्रीस खेळ चाले..! अंधार पडला की सुरू होते ‘दादा’ गिरी..?

Next Post

सांगलीत महिलेवर खुनीहल्ला…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत महिलेवर खुनीहल्ला…

सांगलीत महिलेवर खुनीहल्ला...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group