• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | ” उपमुख्यमंत्री अजित पवार आले अन म्हणाले..! पहाटे ..”

Admin by Admin
May 15, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सांगली | ” उपमुख्यमंत्री अजित पवार आले अन म्हणाले..! पहाटे ..”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली: खबऱ्या प्रतिनिधी ; भोंगे, हनुमान चालिसा हे राजकीय स्वार्थासाठी सुरू आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. काही लोक माथी भडकावून महाराष्ट्रातील वातावरण खराब करत आहेत.

हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच, सकाळी ८ म्हणजे पहाटे ५ नव्हे, पण तुमची पहाट असेल तर धन्यचं, अशा शब्दात भाजपासोबतच्या शपथविधीच्या वेळेवरून विरोधकांना टोला लगावला आहे. अजित पवार हे सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘कोरोनामुळे सरकारची आर्थिक घडी बिघडली आहे. पण, राज्य सरकार काम करत आहे. सांगली महापालिका क्षेत्रात अंडर ग्राऊंड ड्रेनेज व्यवस्था करण्यासाठी प्राधान्य देणार, राज्यातील सर्व महापालिकेने देखील अंडरग्राऊंड ड्रेनेज करणे गरजेचे आहे. सांगली महापालिकेला १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर करत असून २५ कोटी तातडीने देणार, दिलेला निधीचा महापालिकेने योग्य ऊपयोग करावा. तसेच, आज शहरातील कचऱ्याची विलेवाट लावण्यासाठी महापालिका, नगरपालिकेने प्राधान्य देणे गरजेचे आहे. कचऱ्यावर अनेक ठिकाणी प्रक्रिया करण्यात येते. या गोष्टींकडे दुर्लक्ष करणाऱ्या सदस्यांना अपात्र करण्याच्या बाबतीत कायदा किंवा बंधने घातली पाहिजेत या दृष्टीने आपला विचार आहेत, असं अजित पवार म्हणाले.

‘यंदा महाराष्ट्रात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण, ऊस लवकर संपेल याचे नियोजन केलं आहे. तसेच, रिकव्हरी खूप लॉस झाली आहे. २०० रुपये टनचं नुकसान झाले आहे. तर सोयाबीन आणि कापूसासाठी निधी दिलेला आहे’, असंही त्यांनी सांगितलं.

‘जे काय सध्या महाराष्ट्र चाललंय ते पटत नाही. आज खऱ्या अर्थाने प्रश्न आहे तो महागाईचा. पण, काही लोक माथी भडकवायचं काम करत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे, हे चुकीचं आहे. मुख्यमंत्रीसुद्धा आजपर्यंत शांत होते. पण, काही लोक राजकीय स्वार्थासाठी भोंगे, हनुमान चालिसा असे धार्मिक मुद्दे करत आहेत. काही व्यक्ती विकृतपणे बोलत असतील, तर विनाश काले विपरीत बुद्धी असे एका वाक्यात म्हणावे लागेल. संविधानाने आपल्याला अधिकारी दिला आहे, म्हणून काहीही बोलावं हे योग्य नाही. त्यामुळे राज्यातील वातावरण खराब होणार असेल, तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. शरद पवारांचे ६० वर्षाची कारकीर्द आहे. पण, त्यांनी कधी कमरेच्या खालची टीका, आरोप कोणावर केला नाही’, असंही अजित पवार म्हणाले.

‘मुख्यमंत्री बोलले नसते तर चुकीचा अर्थ काढला असता. त्यामुळे ते १४ तारखेला बोलणार होते. त्यांनी भूमिका मांडली. पण, मला मुख्यमंत्री काय बोलले यात अजिबात इंटरेस्ट नाही. आपण विकासाचं बोलू, तसेच उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेमधून पहाटेच्या शपथविधीचा केलेल्या उल्लेखावरून बोलताना आपण त्या वेळीच काही गोष्टी बोललो आहोत आणि ज्या वेळी आपल्याला वाटेल त्यावेळी त्या सर्व गोष्टी बोलू आता ती वेळ नाही. पण, काही लोक पहाटे पहाटे असं सारखं सांगतात. सकाळी आठ वाजता म्हणजे त्यांच्यासाठी पहाट असेल तर ते धन्यच’, अशा शब्दात अजित पवारांनी फटकारलं आहे.

Previous Post

आटपाडीतील व्यापार्‍याची तीन कोटींची लूट..?

Next Post

“बाबा रे… आता , दादा मास्क काढा म्हणाल.. नंतर कपडे पण काढा म्हणशील…अजित दादांची मिश्किली…!” दिलखुलास व्यक्तिमत्त्व असल्याची पत्रकारांमध्ये चर्चा…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“बाबा रे… आता , दादा मास्क काढा म्हणाल.. नंतर कपडे पण काढा म्हणशील…अजित दादांची मिश्किली…!” दिलखुलास व्यक्तिमत्त्व असल्याची पत्रकारांमध्ये चर्चा…

"बाबा रे... आता , दादा मास्क काढा म्हणाल.. नंतर कपडे पण काढा म्हणशील...अजित दादांची मिश्किली...!" दिलखुलास व्यक्तिमत्त्व असल्याची पत्रकारांमध्ये चर्चा...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group