सांगली : खबऱ्या प्रतिनिधी : येथील नवहिंद प्रतिष्ठानने सांगलीत प्रथमच सुरू केलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने संभाजीराजे यांच्या पुतळ्याचे पूजन महिलांच्या हस्ते करून जन्मोत्सवास प्रारंभ करण्याचा आगळावेगळा पायंडा सांगलीत पाडण्यात आला. दिवसभर शहरातील विविध युवक मंडळे गटागटाने येऊन शंभूराजेंना अभिवादन करत होते.
सांगली जिल्ह्यात प्रथमच होणाऱ्या अशा जन्मोत्सव समारंभात संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन महिलांच्या हस्ते करण्याचा निर्णय प्रतिष्ठानने घेतला होता. त्यानुसार जन्मोत्सव रात्री बारा वाजता स्टेशन चौकात अत्यंत थांततेत साजरा करण्यात आला. नवहिंद प्रतिष्ठान महिला मंडळाच्या दीपश्री काटकर, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सुजाता इंगळे, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष प्रणिता पवार, महिला उद्योजिका कक्षाच्या विभागीय अध्यक्ष आशाताई पाटील, ज्योती चव्हाण, नगरसेविका सुनंदा राऊत यांच्यासह महिलांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांनी संभाजी महाराजांचा पाळणा म्हणून मिठाई वाटली व आतषबाजी करुन जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी सौ. लीना तावशी, सौ. ऋतुजा जाधव, सौ. अमृता काटकर,सौ. उषा चव्हाण, सौ. रुपाली चव्हाण, सौ.अरुणा येडेकर, सौ पूनम चव्हाण, सौ.गौरी शिंदे, सौ. लता कचरे, सौ कविता चव्हाण, सौ संगीता चव्हाण, सौ रेशमा शेख, सौ दिपाली चाळके, सौ छाया पानबुडे, सौ राणी पवार, श्रीमती राणी कराळे, सौ वृंदा पोरे, सौ दीपा माने, सौ राणी माने , सौ वैशाली माने, सौ नीता चव्हाण, सौ नीता खंडागळे, सौ शोभा तावशी, सौ सावित्री तावशी, सौ. साळुंखे आदी भगिनी उपस्थित होत्या.
उद्या मंत्र्यांची भेट, बानुगडेंचे व्याख्यान
उद्या सोमवारी सकाळी ११ वाजता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन तर सायंकाळी प्रा. नितीन बानुगडेंचे संभाजीराजांचे जीवन व मराठी अस्मिता या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्याचा लाभ सांगलीकरांनी सहकुटुंब घ्यावा असे आवाहन नवहिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंभूराज काटकर यांनी केले आहे.

