मिरज : खबऱ्या प्रतिनिधी : येथील गांधी चौक मिशन हॉस्पिटल जवळील संभाजी ब्रिगेड वाहतूक संघटनेच्या लोकसेवा रिक्षा स्टॉप चे उद्घाटन महापौर दिग्विजय सूर्यवंशी गटनेते संजय बापू मेंढे व संजय नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय शिरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
याप्रसंगी महापालीकेचे शहर अभियंता इंजीनीयर संजय देसाई , शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष तानाजी सातपुते, मराठा सेवा संघाचे अमृतराव सुर्यवंशी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील उपस्थित होते. कामगार नेते ॲड.के.डी. शिंदे यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. यावेळी या स्टॉपचे आयोजक संभाजी ब्रिगेड वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जाधव, सचिव रशीद शेख, तालुका अध्यक्ष राजू जाधव, स्टॉपचे अध्यक्ष संदिप पवार , उपाध्यक्ष महेबुब मुल्ला, मर्याप्पा दोरकर,अकबर नदाफ, विष्णू कोष्टी, वैभव सुर्यवंशी,मिरज शहर अध्यक्ष मुन्ना जमादार व इतर मान्यवर उपस्थित होते.

