• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कोल्हापूर |अंबाबाई मंदिरात गळती; व्हिडीओ व्हायरल

Admin by Admin
July 14, 2026
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष, सामाजिक
1 min read
0
कोल्हापूर |अंबाबाई मंदिरात गळती; व्हिडीओ व्हायरल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

निकृष्ट काम की अन्य कारण? जाब विचारणार : सुर्वे

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पावसात गळती लागली होती. त्याचा व्हिडीओ सोमवारी व्हायरल झाला. मंदिरात सध्या सुरू असलेल्या मंदिर जतन संवर्धनाचे निकृष्ट काम की अन्य कारणांनी ही गळती लागली, याचा जाब प्रशासनाला विचारला जाईल, असे शिवसेनेचे हर्षल सुर्वे यांनी सांगितले.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाबाई मंदिरात तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. हे काम पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली होत असले तरी ते योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप केला जात आहे. संपूर्ण मंदिरातील अंतर्गत आणि बाह्य नक्षीकाम, विविध कलाकुसर, मूर्तींचे मूळ रूप जतन करण्यासाठी केल्या जाणाऱ्या कामात ग्राईंडरचा वापर केला जात आहे. त्यामुळे मूळ सौंदर्याला बाधा येण्याची भीती आहे. या कामांमुळे मंदिरात गळती लागल्याची शक्यता आहे.

शहरात गेल्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाला. यावेळी मंदिरात शनिमंदिराकडील दरवाजापासून ते बाहेर पडणाऱ्या दरवाजापर्यंत सर्व खांबावरून मोठ्या प्रमाणात पाणी ठिपकत होते. या ठिकाणी बादलीही ठेवण्यात आली होती. या गळतीने मंदिरातून बाहेर पडणाऱ्या मार्गावरही पाणीच पाणी झाल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. आपल्याला मिळालेल्या या व्हिडीओबाबत अधिक माहिती घेतली जात असून प्रशासनाकडे याबाबत जाब विचारला जाईल, असेही सुर्वे यांनी सांगितले.

Previous Post

मुलगी झाल्‍याने छळ; मातेने जीवन संपवले

Next Post

वेळापूर | वारकऱ्यांच्या सेवा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
वेळापूर | वारकऱ्यांच्या सेवा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

वेळापूर | वारकऱ्यांच्या सेवा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group