• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

वाई-पाचगणी घाटात दरड कोसळली

Admin by Admin
July 4, 2026
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
वाई-पाचगणी घाटात दरड कोसळली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या महाबळेश्‍वर व पाचगणीकडे जाणार्‍या वाईतील पसरणी घाटात मुसळधार पावसामुळे शुक्रवारी दरड कोसळली. घाटातील बुवासाहेब मंदिराजवळ दरड रस्‍त्‍यावर आली. यामुळे काही काळ वाहतूक विस्‍कळीत झाली होती. मात्र, याची माहिती समजल्‍यानंतर ही दरड हटवून वाहतूक पूर्ववत करण्‍यात आली.

जिल्‍ह्याच्‍या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर वाढला आहे. त्‍यामुळे घाटांमध्‍ये दरडी कोसळण्‍याचे सत्र सुरू झाले आहे. गेली दोन दिवस आंबेनळी घाटात दरड कोसळली होती. या दरडींचे सत्र शुक्रवारीही सुरूच होते. शुक्रवारी सकाळी पसरणी घाटातील बुवासाहेब मंदिर परिसरात दरड रस्‍त्‍यावर कोसळली. सकाळची वेळ व वाहतूक कमी असल्‍याने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

या घटनेची माहिती मिळाल्‍यानंतर स्‍थानिकांनी ही दरड हटवली. घाटात अजूनही पाऊस सुरू असून धुक्याचे साम्राज्य आहे. तसेच डोंगरावरून आणखी दगड खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी उपाययोजना कराव्‍या, अशी मागणी होत आहे.

ADVT – सांगली पोलिसांकडून अधिकृत प्रसारित
Previous Post

मिरज ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; अवैध वाळू व मुरूम वाहतूक करणारे दोन डंपर जप्त

Next Post

अंजनीतील बैलगाडा शर्यतीत हाणामारीप्रकरणी २५ जणांवर गुन्हा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

अंजनीतील बैलगाडा शर्यतीत हाणामारीप्रकरणी २५ जणांवर गुन्हा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group