Friday, June 6, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मालाच्या ‘नेट-वेट’ मध्ये तूट; ग्राहकांची होतेय लूट..

Admin by Admin
May 14, 2022
in विशेष, शोध पत्रकारिता
0
मालाच्या ‘नेट-वेट’ मध्ये तूट; ग्राहकांची होतेय लूट..

खबऱ्या विशेष /सांगली ;

सर्वसामान्यांच्या घरामध्ये उन्हाळ्यामध्येच अन्नधान्य, डाळी, कडधान्यासह वर्षभराची बेगमी खरेदी केली जाते. सध्या बाजारपेठेत मशीनवरील स्वच्छ व निवडक धान्याचे पॅकिंग खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे.

मात्र, मालाच्या पॅकींगवरील नेट वेट आणि प्रत्यक्ष वजनामध्ये तूट आढळून येत असल्याने ग्राहकांची आर्थिक लूट होत आहे. जेवढे वजन तेवढेच पैसे आकारले जावेत, अशी मागणी ग्राहकांमधून जोर धरु लागली आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने धान्यासह डाळी, मिरच्या, उन्हाळी वाळवणांची लगबग घरोघरी सुरु आहे. पूर्वीप्रमाणे भरपूर नसले तरी वर्षभरासाठी आवश्यक तेवढे धान्य साठवण आजही केली जाते. त्यासाठी बाजारपेठेत मशीनवरील स्वच्छ व निवडक धान्याचे पॅकिंग खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. धान्य निवडण्याची, स्वच्छतेची कटकट नको म्हणून धान्यासह जीवनावश्यक वस्तू, किराणा मालही पॅकींगमधलाच घेणारा एक खास वर्ग तयार झाला आहे. किराणा सामानही जास्त प्रमाणात खरेदी केले जाते. किरकोळ मालाच्या तुलनेत पॅकिंग मालाची किंमत कमी असते. थोड्या फायद्यासाठी नागरिक जास्त पैसे गुंतवतात. मात्र, धान्यासह सर्वच मोठ्या पॅकिंगवर नेट-वेट नमूद करुन त्यावर दिलेल्या किंमतीला ते खरेदी केले जाते. ते वजन पॅकिंगवेळचे असते. ग्राहकापर्यंत पोहचेपर्यंत त्यात घट झालेली असते. त्यामुळे अनेकदा मालाचे नेट-वेट पॅकींग आणि प्रत्यक्ष वजनामध्ये तफावत आढळून येत असली तरी पॅकींगवेळीच निश्चित केलेली किंमत ग्राहकांना मोजावी लागते. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.

कमी वजनाच्या तुलनेत मोठ्या वजनाच्या पॅकींगमध्ये ग्राहकांचा जास्त तोटा होत आहे. मालाच्या नेट वेटच्या नावाखाली राजरोसपणे ग्राहकांची फसवणूक होत आहे. अलिकडे ग्राहकांमध्ये आपल्या हक्कांबाबत जागरुकता वाढली आहे. जेवढे वजन तेवढेच पैसे आकारले जावेत, अशी मागणी ग्राहकांमधून जोर धरु लागली आहे.

Previous Post

कराड : ट्रॅक्टर स्कॉर्पीओ अपघातात बालकासह सहा जखमी..

Next Post

मराठी मातीचा अनमोल हिरा : छत्रपती संभाजी राजे…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मराठी मातीचा अनमोल हिरा : छत्रपती संभाजी राजे…

मराठी मातीचा अनमोल हिरा : छत्रपती संभाजी राजे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014