• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दोन पिस्तूल, चार काडतुसे जप्त; सांगलीच्या दोन तरुणांना अटक : माळमारुती पोलिसांची मध्यरात्री कारवाई..!

Admin by Admin
January 27, 2026
in क्राईम
1 min read
0
दोन पिस्तूल, चार काडतुसे जप्त; सांगलीच्या दोन तरुणांना अटक : माळमारुती पोलिसांची मध्यरात्री कारवाई..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली जिल्ह्यातील दोन तरुणांना अटक करून त्यांच्याजवळून दोन गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

शनिवारी मध्यरात्रीनंतर केएलई हॉस्पिटल पुढील बेळगाव कत्रीवर माळमारुती पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याबाबत माहिती अशी की, केए २५ एमडी ६३०१ क्रमांकाच्या कारमधून आलेल्या सांगली जिल्ह्यातील दोन तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील बॅग तपासली असता या बॅगमध्ये गावठी पिस्तूल आढळून आली. त्यामुळे लगेच त्यांना अटक करण्यात आली. मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. रविंद्र नाईक (वय ३७) रा. मिरज, जि. सांगली, शाहीद रईसमोहम्मद पटेल (वय २१) राहणार आरग, ता. मिरज, जि. सांगली अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

रविंद्र व शाहीदजवळून दोन कंट्री पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, ८ जीबीचे मेमरी कार्ड, एक आयफोन, एक कि-पॅड मोबाईल, पिस्तूल ठेवण्यासाठी वापरलेली स्कूल बॅग व कार जप्त करण्यात आली आहे. या दोघा जणांवर भारतीय न्याय संहिता कलम ६१ (१ ), सहकलम ३(५) व भारतीय शस्त्रास्त्र कायदा १९५९ च्या कलम २५(१ए), २९(ए) व (बी) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या पथकात पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी, पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील, पोलीस उपनिरीक्षक पी. एम. मोहिते, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. एफ. बस्तवाड, अरुण कांबळे, सी. आय. चिगरी, मारुती कुरेर, के. बी. गौराणी, सी. जे. चिन्नाप्पगोळ, मल्लिकार्जुन गाडवी, महेश वडेयर, प्रकाश कोन्नण्णावर, गोपाल लठ्ठी, दीपक बिचगत्ती व तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशिद आदी अधिकारी व पोलिसांचा समावेश आहे. ही पिस्तूल कोठे नेण्यात येत होती? याची चौकशी करण्यात येत आहे.

Previous Post

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, वेळ अन् पैसा का वाया घालवता अर्ज मागे घ्या.!

Next Post

महाराष्ट्र हादरला! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
महाराष्ट्र हादरला! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू

महाराष्ट्र हादरला! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group